आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Experience Playing With Indus Is More Beneficial For Performance Enhancement: Upliftment |MARATHI NEWS

दिव्य मराठी विशेष:सिंधूसोबत खेळण्याचा अनुभव कामगिरी उंचावण्यासाठी अधिक फायदेशीर : उन्नती

चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत पदकाची प्रबळ दावेदार

“प्रतिष्ठेच्या उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान डबल ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूसोबत खेळण्याचा मला मोठा फायदा झाला. यामुळे कामगिरीतील अनेक उणिवा दूर करता आल्या. तिच्यासोबत खेळण्याचा अनुभव कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी अधिक फायदेशीर ठरला. त्यामुळे क्रमवारीतही मोठी प्रगती साधता आली. आता पदकाचा पल्ला गाठणार,’ असा विश्वास युवा बॅडमिंटनपटू उन्नती हुडाने दैनिक दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केला. तिने नुकत्याच झालेल्या उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ओडिशा ओपन चॅम्पियन १४ वर्षीय उन्नती ही सध्या चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया स्पर्धेत पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. तिने नुकताच ओडिशा ओपन स्पर्धेचा किताब पटकावला. याच कामगिरीच्या बळावर तिने देशाच्या १९ वर्षांखालील क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. ती आता हरियाणातील स्पर्धेत सहभागी आहे.

बातम्या आणखी आहेत...