आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमहर्षक:‘एमएमए’मध्ये आज तरुणाविरुद्ध “अनुभवी’त टक्कर ; यूएफसी फाइट नाइटमध्ये विटोरीशी सामना

चंदीगड / गौरव मारवाह23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूएफसीमधील ज्येष्ठ रेसलर राॅबर्ट विकटकर पुन्हा एकदा रिंगमध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे. या वेळी त्याचा सामना इटलीच्या २८ वर्षीय फायटर मार्विन विटोरीसोबत होणार आहे. विकटकर तरुण रेसलरला हरवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु ही लढत त्याच्यासाठी सोपी नसेल. मार्विन वर्ल्ड नं. २ आहे. त्याने म्हटले की, ‘एमएमएपूर्वी मी मार्शल आर्ट््समध्ये प्रयत्न केले आहेत. मी तरुण योद्ध्याशी (विटोरी) भिडण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.’ तर सादर आहेत न्यूझीलंडच्या रॉबर्ट विकटरसोबच्या वार्तालापातील प्रमुख अंश...

तू विटोरीविरोधात कोणत्या प्रकारची कामगिरी करू पाहताेय?
ताे वर्ल्ड नं. २ आहे. मला त्याच्याकडून कडवे आव्हान मिळेल. तो खेळात निष्णात आहे. त्याच्यासाठी माझ्या मनात खूप सन्मान आहे. परंतु मला आशा आहे की मी त्याला हरवू शकतो. रिंगमध्ये मी पूर्वीसारखी आक्रमक फाइट खेळू इच्छितो. १५ मिनिटांच्या फाइटमध्ये मी माझे सर्वोत्तम देऊ पाहतोय.

तुझा एमएमएमधील प्रवास कसा राहिलाॽ सुरुवात कशी केली ॽ
मी लहानपणी मार्शल आर्ट सुरू केले होते. त्यानंतर माझा एमएमएचा प्रवास सुरू झाला. मला हा खेळ खूप आवडतो. यात केले जाणारे सर्वच आवडते. यात विजयाचे अनेक मार्ग आहेत. जर तुम्ही जखमी झाला तरीही तुम्ही विरोधकावर भारी पडू शकता आणि सामना जिंकू शकता. हा खेळ सर्व लढाऊ खेळांच्या तुलनेत जास्त रोमहर्षक आहे.

तुला एमएमएमध्ये यश मिळाले, पण तू हा खेळ सुरू का ठेवला नाहीॽ
मी सुमारे दहा वर्षांपासून यात आहे. मी पण कधीकधी हैराण होतो. मी यूएफसी अनेक वर्षे खेळलो. परंतु एमएमए त्यापेक्षाही जास्त खेळलो. आता मी एक प्रगल्भ खेळाडू झालो आहे. मला त्याप्रमाणे बदलावे लागले. सर्वांनाच अशा प्रकारच्या बदलांचा सामना करावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...