आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Experiment Of Federation; Five And Five Basketball League, Opportunities For 72 Players; 15 Matches In 45 Days

बास्केटबाॅलपटूंसाठी पहिल्यांदाच लीग:महासंघाचा प्रयाेग;  फाइव्ह अँड फाइव्ह बास्केटबाॅल लीग, 72 खेळाडूंना संधी; 45 दिवसांत 15 सामने

एकनाथ पाठक | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील युवा आणि स्टार बास्केटबाॅलपटूंच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी खास प्रयाेग साकारण्यात आला आहे. भारतीय बास्केटबाॅल महासंघाच्या पुढाकाराने यासाठी खास लीगचे आयाेजन करण्यात आले आहे. आयपीएलच्या धर्तीवर देशात पहिल्यांदाच नॅशनल लीगचे आयाेजन करण्यात आले आहे. यातून सध्या देशात फाइव्ह अँड फाइव्ह नॅशनल लीगला सुरुवात झाली आहे. आयएनबीएल नावाच्या या पहिल्या सत्राच्या लीगमध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत. या संघांमध्ये प्रत्येक राज्यातील बास्केटबाॅलपटूंना सहभागी हाेण्याची संधी देण्यात आली. यातून स्पर्धेतील सहा संघांमध्ये देशभरातील युवा ख‌ेळाडू सहभागी झाले आहेत. ऑक्टाेबरपासून सुरू झालेल्या या लीगचे ४५ दिवसांमध्ये १५ सामने हाेणार आहेत. यासाठी तीन फेऱ्यांचे आयाेजन करण्यात आले. याची पहिली फेरी ऑक्टाेबर महिन्यात काेची येथे पार पडली. त्यानंतर याच्या दुसऱ्या फेरीला जयपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या लीगची तिसरी आणि शेवटची फेरी महाराष्ट्राच्या पुण्यातील बालेवाडीमध्ये हाेणार आहे. यासह डिसेंबरमध्ये या पहिल्या आयएनबीएल लीगचा समाराेप हाेणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर आयाेजित करण्यात आलेल्या या लीगच्या माध्यमातून युवांना आता आर्थिक पाठबळही देण्याचा महासंघाचा मानस आहे.

सहा संघ; प्रत्येक टीममध्ये १२ खेळाडू या बास्केटबॉल लीगमध्ये पहिल्या सत्रासाठी सहा संघांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई टायटन्स, कोची टायगर्स, बंगळुरू किंग्ज, चंदीगड वॉरियर्स, दिल्ली आणि चेन्नई हिट्स संघाचा समावेश आहे. यातील प्रत्येक संघात १२ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण सामन्यादरम्यान पाच खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. एका संघात आसपासच्या राज्यातील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई टायटन्स संघात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा राज्यातील खेळाडूंचा समावेश आहे. चंदीगड संघात चंदीगड, पंजाब, हरियाणा, रेल्वे, सर्व्हिसेस खेळाडूंचा समावेश आहे.

४० मिनिटांत १२ खेळाडूंना संधी: या लीगच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी मजबूत भारतीय संघ तयार करणे हा यामागचा उद्देश आहे. ४० मिनिटांच्या सामन्यादरम्यान सहभागी संघातील १२ खेळाडूंना खेळण्याची संधी दिली जाते.

मजबूत संघ बनवण्याची संधी फेडरेशनने ५ आणि ५ बास्केटबॉल लीगच्या माध्यमातून खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले खेळण्याची संधी मिळते. देशाला मजबूत संघ बनवण्याची ही चांगली संधी आहे. शत्रुघ्न गोखले, सचिव महा संघटना

बातम्या आणखी आहेत...