आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचा गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा 4 जून रोजी नेदरलँड्समध्ये होणाऱ्या फॅनी ब्लँकर्स-कोएन गेम्स (FBK) गेम्स 2023 मध्ये सहभागी होणार आहे. FBK गेम्स ही डच ऍथलेटिक्स मीट आहे, जी दरवर्षी हेन्गेलो येथील फॅनी ब्लँकर्स-कोएन स्टेडियमवर आयोजित केली जाते. ही एकदिवसीय मीट एलिट-स्तरीय जागतिक अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर गोल्ड मालिकेचा भाग आहे.
FBK गेम्स हा नीरज चोप्राचा 2023 सालातील दुसरा कार्यक्रम असेल. भारतीय भालाफेकपटूने या महिन्याच्या सुरुवातीला वर्षातील त्याच्या पहिल्याच स्पर्धेत दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले होते. वर्तमान डायमंड लीग चॅम्पियन नीरज चोप्राने कतार स्पोर्ट्स क्लबवर 88.67 मीटर फेक करून दोहा लीग जिंकली.
FBK गेम्स फॅनी ब्लँकर्स-कोएनच्या नावाने आयोजित केले जातात
FBK गेम्स ही जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर गोल्ड लेव्हल मीट आहे. लंडनमधील 1948 च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये चार सुवर्णपदके जिंकणाऱ्या डच ऑलिंपियन फॅनी ब्लँकर्स-कोएनच्या नावावरून हे नाव देण्यात आले. सध्याचा डायमंड लीग चॅम्पियन चोप्रा पुन्हा FBK गेम्समध्ये गतविजेता अँडरसन पीटर्सचा सामना करेल.
जगातील अव्वल दोन भालाफेकपटूंमधील ही एका महिन्यातील दुसरी लढत असेल. पीटर्स दोहामध्ये 85.88 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह तिसरे तर ऑलिंपिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेज 88.63 मीटरसह दुसऱ्या स्थानावर होता.
नीरज चोप्रा तुर्कीतील अंतल्या येथे प्रशिक्षण घेत आहे
दोहामध्ये तिसरे स्थान मिळवल्यानंतर पीटर्सने सांगितले की त्याची पुढील स्पर्धा हेन्जेलोमध्ये होईल. गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या जागतिक स्पर्धेत चोप्राने पीटर्सनंतर दुसरे स्थान पटकावले होते. चोप्रा तुर्कीतील अंताल्या येथे प्रशिक्षण घेत आहेत. 27 जून रोजी झेक प्रजासत्ताक येथे होणार्या ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक इव्हेंटमध्येही तो भाग घेणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.