आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Fantasy Sports Revenue Triples In A Year, With People Spending Rs 16,500 Crore A Year Playing Games

फँटसी स्पाेर्ट्स:फँटसी स्पाेर्ट्सच्या महसुलात झाली एका वर्षात तीनपट वाढ, लोकांचे एका वर्षात गेम खेळण्यात 16,500 कोटी रुपये खर्च

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी क्रीडा व केपीएमजीचा अहवाल, तीन वर्षांत सदस्य 20 लाखांनी वाढून 89 कोटी झाले
  • 2016 मध्ये 10 संचालक होते, 2019 मध्ये 140 झाले

कोविड-१९ मुळे जगभरात क्रीडा क्षेत्र ठप्प आहे. मात्र, देशातील कल्पनारम्य (फँटसी) क्रीडाच्या व्यवसायात काही फरक पडला नाही. फेडरेशन आॅफ इंडियन फँटसी स्पोर्ट््स (एफआयएफएस) व केपीएमजीच्या अहवालानुसार तीन पटीने वाढ झाली. २०१८-१९ मध्ये कमाई ९२० कोटी होती, जी २०१९-२० मध्ये वाढून २४७० कोटी रुपये झाली. एका वर्षात स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी लोक जेवढा पैसा खर्च करतात, त्यामध्ये तीन पट वाढ पहायला मिळाली. २०१९-२० मध्ये प्रवेशासाठी १६,५०० कोटी रुपये खर्च केला. २०१८-१९ मध्ये हा केवळ ६ हजार कोटी रुपये होता.

८५ टक्के लोकांनी पैसा क्रिकेटवर लावला

क्रिकेट देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. २०१९ मध्ये लोकांनी सर्वाधिक ८५ टक्के पैसा क्रिकेटवर लावला. मात्र, गेल्या तीन वर्षांत फुटबॉल व कबड्डीमुळे त्यात घसरण झाली. २०१६ मध्ये जवळपास ९५ टक्के पैसा क्रिकेट लागत होता. ड्रीम-११ चे सहसंस्थापक हर्ष जैनने म्हटले की, ‘कोरोनामुळे जवळपास खेळ बंद झाला होता, तेव्हा भारतीय चाहत्यांनी फँटसी क्रीडाद्वारे बेलारूस फुटबॉल, तजाकिस्तान बास्केटबाॅल व तैवान बेसबॉलकडे मोर्चा वळवला.’ फँटसी लीगमध्ये आयपीएलचा मोठा भाग असतो, मात्र यंदा कोविड-१९ मुळे लीग सध्या स्थगित आहे.

ड्रीम-११ चे सर्वाधिक ७.५ कोटी सदस्य

फँटसी क्रीडाच्या वापरकर्त्यांचा विचार केल्यास ड्रीम-११ चे सर्वाधिक ७.५ कोटी सदस्य आहेत. माजी कर्णधार एम.एस. धोनी त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. २०१८-१९ मध्ये कमाई ७७५ कोटी रुपये होती. यादरम्यान फँटसी स्पोर्ट््स कंपनीने जाहिरात व प्रमोशनवर ७८५ कोटी रुपये खर्च केले. ड्रीम-११ बीसीसीआय व आयपीएलचे मुख्य प्रायोजक आहे. बीसीसीआय अध्यक्ष गांगुली माय-११ सर्कल, व सेहवाग माय टीम-११ व युवराज फलंदाजीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या वर्षी आयपीएल झाले नाही तर, या सर्वांच्या कमाईत ३० ते ४० % घसरण होऊ शकते.

भारत फँटसी स्पोर्ट्समध्ये चॅम्पियन बनेल : अमिताभ

नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांतने म्हटले की, मला पहिल्यापासून विश्वास आहे, भारत फँटसी क्रीडा व्यवसायात जागतिक चॅम्पियन बनू शकतो. त्यासह यामध्ये नोकरीचीदेखील चांगली संधी असेल. एफआयएफएसचे सामरिक सल्लागार अमृत माथूरने म्हटले की, गेल्या काही महिन्यांत खेळावर खूप वाईट परिणाम झाला आहे. देशात पुन्हा खेळ सुरू झाल्यास तो लवकर परतू शकतो, कारण देशात खेळाची मागणी वाढत आहे. मात्र, या सर्वांमध्ये त्याला तपासण्यासाठी योग्य माध्यमाची गरज आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेची लीग म्हणून मोहालीमध्ये एक टी-२० लीग घेण्यात आली. फॅन कोडवर त्याचे थेट प्रक्षेपण देखील केले होते.

0