आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Farmers Real Weapon Will Be The Slingshot In The World Cup; News And Live Updates

राष्ट्रीय क्रीडा दिन:बळीराजाचे अस्सल हत्यार गोफण वर्ल्ड कपमध्ये घुमणार; प्राचीन काळापासून हत्यार, सुरक्षेचे साधन म्हणून व्हायचा वापर, आता खेळाचा दर्जा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 राज्यांत खेळला जातो हा खेळ, महाराष्ट्रातील 30 जिल्हे प्रसिद्ध

गोफण (स्लिंग) प्राचीन काळापासून एक सुरक्षेचे साधन म्हणून वापरले जाणारे पण दुर्लक्षित असे साधन. परंतु, २१ व्या शतकात हीच कला खेळ म्हणून उदयास आली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा वेगाने प्रसार होत आहे. या गोफणमुळे शेतकरी व त्यांच्या पुत्रांसह इतरांना क्रीडा क्षेत्रात नवे व्यासपीठ निर्माण झाले झाले. स्पेनसह हा खेळ आता ३६ देशांमध्ये पोहोचला आहे.

अश्मयुगापासून ते छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे सैन्यही युद्धात गोफणीचा हत्यार म्हणून उपयोग करत. उमाजी नाईक यांनी गोफणीच्या जोरावर इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. ग्रामीण भागातील शेतकरी पिकांचे जंगली प्राण्यांपासून व पक्ष्यापासून रक्षण करण्यासाठी आजही गोफणीचा वापर करतात. आता भारतात अमॅच्युअर स्लिगिंग इंडिया फेडरेशनच्या माध्यमातून गोफण खेळण्याची संधी मिळाली आहे.

सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा प्रकार
स्पर्धा वैयक्तिक व सांघिक (५ खेळाडू) प्रकारात खेळली जाते. यात १६ वर्षाखालील आणि १६ वर्षावरील दोन गट असतात. जेष्ठ शेतकरी देखील यात खेळू शकतात. १६ वर्षाआतील गटात शॉर्टमध्ये १० मीटर व लाँन्गमध्ये २० मीटर प्रकार आहेत. १६ वर्षाआतील गटात ३० मीटर प्रकार असतो. प्रत्येक खेळाडूला टार्गेटवर ५ हिट करावे लागतात. टार्गेट बॉक्स १.२० चौरस मीटरचा अाणि आतील वर्तुळ ५० स्कोटर मीटरचे असते. जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावले जाते. वर्तुळात दगड-चेंडू लागल्यास २ गुण व बोर्डला लागल्यास १ गुण मिळतो. सर्वाधिक गुण मिळवणारा विजयी बनतो.

१२ राज्यांत खेळला जातो हा खेळ, महाराष्ट्रातील ३० जिल्हे प्रसिद्ध

  • भारतात या खेळाचे पुणे मुख्यालय असून येथील भागवत क्रीडा संकुलात खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. शिबिरे व ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
  • या खेळाच्या अातापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय स्पर्धा व एक विश्व कप स्पर्धा झाली आहे. स्पेनमध्ये १४ ते १७ अाॅक्टाेबर २०२१ मध्ये दुसरी विश्व कप स्पर्धा होणार असून स्पर्धेत ३४ देशांचे संघ सहभागी हाेणार अाहेत.

असे आहे खेळाचे साहित्य
गोफण हे ग्रामीण भागात सर्वत्र सहज उपलब्ध होते. सुताच्या दोरीपासून तयार केलेली असते. तिची लांबी १.५ ते २ मीटर असते. खेळाचे चेंडू व दुसरा दगड असे दोन प्रकार आहेत. टेनिस बॉलचे वजन ५६-५८ ग्रॅम आणि नदीतील गोट्याचे वजन १२८-१३० ग्रॅम असते. साहित्याचा खर्च अवघे ३०० रुपये येतो.

पारंपरिक वारसा जपण्यासाठी धडपड
आम्ही शिवकालीन युद्धकला जपतो. गोफणदेखील एक पारंपरिक वारसा आहे. ताे आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. त्याला खेळाचे स्वरूप आल्याने आणखी प्रसिद्ध होईल. या खेळाचा ज्येष्ठ शेतकरी व त्यांच्या मुलांना अधिक फायदा होईल. कारण, या खेळाला १ हजार रुपयेदेखील खर्च येत नाही. - कुंडलिक कचाले, कार्यकारी संचालक, अमॅच्युअर स्लिगिंग इंडिया फेडरेशन.

बातम्या आणखी आहेत...