आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Father Gives Chess Lessons To Keep Away From Mobile, Completes Fifth sixth In One Year: Abhimanyu

मुलाखत:​​​​​​​मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी वडिलांनी दिले बुद्धिबळाचे धडे, एकाच वर्षात पाचवी-सहावी पूर्ण केली : अभिमन्यू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगातील सर्वात कमी वयाच्या ग्रँडमास्टरचा १२ तास सराव

अभिमन्यू मिश्रा जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे. १२ वर्षे ४ महिने आणि २५ दिवस या वयात त्याने हे यश मिळवले आहे. त्याच्या नावावर जगातील सर्वात कमी वयाचा मास्टर आणि अमेरिकी इतिहासात सर्वात कमी वयात नॅशनल मास्टर होण्याचा विक्रम नोंद झाला आहे. न्यू जर्सीत राहणाऱ्या अभिमन्यूच्या कुटुंबाचा भोपाळशी संबंध आहे. या खेळाडूने बुद्धिबळ, अभ्यासापासून अनेक विषयांवर चर्चा केली. त्यातील संपादित भाग...

अमेरिकी ग्रँडमास्टर जेम्स टारझनसोबत अभिमन्यू.
भारताशी कसे नाते आहे? - मी अमेरिकेत जन्मलो, पण माझे घर भोपाळमध्ये आहे. माझे काका, आत्या, आजोबा भोपाळमध्ये राहतात. आग्रा हे माझे आजोळ. मला भोपाळ खूप आवडते. मी तेथे २०१६ व २०१८ मध्ये गेलो होतो. २०१६ मध्ये तेथे हायस्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळ खेळलो होतो, जिंकलो होतो.

तू केव्हापासून बुद्धिबळ खेळत आहेस ?
मी वयाच्या अडीच वर्षापासून बुद्धिबळ खेळत आहे. वडिलांनी (हेमंत मिश्रा) आयपॅडपासून दूर ठेवण्यासाठी बुद्धिबळ शिकवण्यास सुरुवात केली. त्यांनी मजेदार पद्धतीने गोष्टी-किश्श्यांद्वारे हत्ती-घोड्याशी परिचय करून दिला. दोन वर्षे रोज मला एक तास चेस शिकवत होते. अशा प्रकारे मला बुद्धिबळाची आवड निर्माण झाली आणि वयाच्या ५ व्या वर्षापासून स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली.

कोविडमध्ये खेळण्याचा अनुभव कसा होता?
ग्रँडमास्टर पुरस्कारासाठी ७७ दिवस बुडापेस्टमध्ये राहावे लागले. एवढ्या दिवसांत ७० सामने खेळलो. सर्वात मोठे आव्हान मास्क आणि शील्ड घालून खेळणे हे होते. लक्ष विचलित होऊ नये म्हणून घरीच अनेक तास मास्क आणि शील्डसह सराव करत होतो.

तू स्पर्धेची तयारी कशी करतो ?
प्रत्येक पराभ‌वानंतर कारणमीमांसा करतो. मागील चुका पुन्हा होऊ नये हे ठरवतो. रोज १२ तास सराव करतो. माझे कोच ग्रँडमास्टर अरुण प्रसाद सुब्रमण्यम यांच्यासोबत आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मागील सामने पाहतो आणि रणनीती ठरवतो.

बुद्धिबळाशी संबंधित आठवणीतील किस्सा?
मी साडेपाच वर्षांचा असताना माझा सामना ३५ वर्षीय स्पर्धकाशी झाला. सामना सायंकाळी ७ वाजेपासून रात्री २ पर्यंत चालला. प्रतिस्पर्ध्याने माझ्या थकव्याचा फायदा घेतला. मी ड्रॉचा प्रस्ताव दिला, पण त्याने मान्य केला नाही. मला गेम सोडावा लागला. पण पुढील वर्षी मी खेळाआधी चांगली झोप घेतली आणि जिंकलोही.

अभ्यासासाठी वेळ कसा काढतोस?
स्पर्धा व सरावामुळे शाळेसाठी वेळ मिळत नाही. गेल्या वर्षी एकाच वर्षात ५ वी, ६ वीचा कोर्स पूर्ण केला. वर्षभर सुटी मिळावी व हा वेळ खेळासाठी खर्च करता यावा हा हेतू होता.

बातम्या आणखी आहेत...