आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बायर्न म्युनिचचा सुपरस्टार स्ट्रायकर रॉबर्ट लेवानडोस्की हा २०९-२० चा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारचा मानकरी ठरला. ऑनलाइन फिफा पुरस्कार सोहळ्यात लेवानडोस्कीने गतसत्रातील विजेत्या मेसी व रोनाल्डोला मागे सोडले. लेवानडोस्कीला ५२ मते मिळाली आणि रोनाल्डोला ३८ व मेसीला ३५ मते मिळवता आली. मेसी व रोनाल्डो दोघांनी लेवानडोस्कीला पहिल्या पसंतीचे मत दिले. त्याने गतसत्रात ४७ सामन्यांत ५५ गोल आणि १० असिस्टदेखील केले. तो बुंदेसलिगा, जर्मन कप व चॅम्पियन्स लीगमधील सर्वाधिक गोल करणारा ठरला.
बार्यनचा नेऊर उत्कृष्ट गोलरक्षक
जर्मन क्लब बायर्न म्युनिचचा मॅन्युअल नेऊर उत्कृष्ट गोलरक्षक ठरला. जर्मनीच्या नेऊरने ३३ सामन्यांत ३१ गोल केेले. त्यांनी अॅथलेटिको माद्रिदच्या जेन ओबलेक व लिव्हरपूलच्या एलिसन बेकरला पराभूत केले.
ब्रांझ सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू
मँचेस्टर सिटीची डिफेंडर लुसी ब्राँझ सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली. २९ वर्षीय ब्राँझ हा पुरस्कार जिंकणारी इंग्लंडची ती पहिली महिलाठरली. तिने डेन्मार्कची हेर्डर व फ्रान्सच्या वेंडी रेनार्डला मागे सोडले. फ्रान्सची सारा बोहादी सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ठरली. हॉलंडच्या सेरिना सर्वोत्कृष्ट काेच ठरल्या.
क्लोप सलग दुसऱ्यांदा बेस्ट कोच
लिव्हरपूलचे जुर्गेन क्लोपला सलग दुसऱ्यांदा उत्कृष्ट प्रशिक्षक निवडण्यात आले. ५३ वर्षीय क्लोपने म्युनिचचे हेन्सी फ्लिक व लीड्सच्या मार्सेलो बिल्साला पराभूत केले.
टॉटेनहमच्या सोनचा उत्कृष्ट गोल नांेंद
टॉटेनहमच्या सोन हियुंग मिनच्या गोलला उत्कृष्ट गोलचा पुरस्कार देण्यात आला. त्याने गतवर्षी बर्नलेविरुद्ध शांतपणे गोल केला होता. तो बॉक्समधून चेंडू घेऊन गेला व एकट्यानेच गोल केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.