आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • FIFA Has Also Refused To Host The Under 17 Women's Football World Cup In India

17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा:भारतात आयोजित करण्यासही फिफाचा नकार; भारतीय फुटबॉल महासंघाले केले निलंबित

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफाने भारतीय फुटबॉल फेडरेशनला निलंबित केले आहे. भारतात 17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यासही फिफाने नकार दिला आहे. याचे आयोजन 11 ते 30 ऑक्टोबरपर्यंत होणार होते. फेडरेशनवर 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच निलंबनाची कारवाई झाली आहे. सरकारने सुप्रीम कोर्टाकडे तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. क्रीडा मंत्रालयाचे एक अधिकारी म्हणाले, फिफाच्या टीमसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत सहमती बनली होती. मात्र, सोमवारी रात्री फिफाने निलंबनाचा निर्णय घेतला. फिफाने सांगितले, फेडरेशनच्या कार्यकारिणीने काम सांभाळताच निर्बंध हटवले जातील. फेडरेशनचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपला तिसरा कार्यकाळ डिसेंबर 2020 मध्ये संपुष्टात आलेला असतानाही पद न सोडल्याने वादाला सुरुवात झाली होती.

बातम्या आणखी आहेत...