आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फोर्ब्सचा रिपोर्ट:काेराेनामुळे फिफाचे चार इव्हेंट स्थगित; 1750 काेटी रुपयांची बसणार झळ!

झुरिचएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
झुरिच येथे फिफा समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर चर्चा केली.
  • आॅलिम्पिकसह 19 व 20 वर्षांखालील महिला विश्वचषक आयाेजन स्थगित
  • फिफाला 3620 काेटी एेवजी 1870 काेटींच्या महसुलाची आहे आशा
Advertisement
Advertisement

काेराेनामुळे जागतिक दर्जाच्या माेठ्या स्पाेर्ट््स इव्हेंटवर पडणारा परिणाम अद्यापही कायम आहे. यामुळेच अनेक माेठ्या स्पर्धांना स्थगिती देण्यात आली. यामध्ये जागतिक स्तरावरील फुटबाॅलची सर्वाेच्च संस्था फिफालाही माेठा फटका बसला आहे. यातूनच फिफाच्या चार माेठ्या इव्हेंटला स्थगिती देण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय जाहीर करण्यात आला. यामध्ये १९ आणि २० वर्षांखालील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धांचा समावेश आहे.

काेराेनामुळे घेण्यात आलेल्या या स्थगितीच्या निर्णयाने आता फिफाला माेठी झळ बसणार आहे. यातून आता फिफाचे जवळपास १७५० काेटींचे आर्थिक नुकसान हाेण्याची शक्यता आहे.

याबाबतचा अहवाल फाेर्ब्जने सादर केला. यामध्ये स्पर्धा आयाेजनाला देण्यात आलेल्या स्थगितीचा फिफाच्या आर्थिक बाजूवर पडणाऱ्या परिणामाचीही माहिती यातून स्पष्ट करण्यात आली. फिफाच्या गव्हर्निग बाॅडीने २०२० च्या आर्थिक वर्षात आपले बजेट सादर केले. यामध्ये स्पर्धेच्या माध्यमातून १८७० काेटी रुपयांच्या कमाईचा अंदाज बांधण्यात आला.

काेराेनासाठी केली ११ हजार काेटींची मदत :

फिफाच्या वतीने आता काेराेनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि बाधित रुग्णांच्या उपचारासाठी मदतीचा हात दिला आहे. यासाठी फिफाने आता ११ हजार काेटींची मदत केली, अशी माहिती अध्यक्ष जियानी इन्फेनिटी यांनी दिली. यादरम्यान फिफाकडे अद्याप २० काेटींची कॅश रिझर्व्ह आहे.

Advertisement
0