आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • FIFA World Cup 1st Match Tonight 9.30 PM : 32 Teams, 6 From Asia, Know Everything...

FIFA विश्वचषकातील पहिला सामना आज रात्री 9.30 वाजता:32 संघ, आशियातील 6, जाणून घ्या सर्वकाही...

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजपासून 22व्या फिफा विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यामध्ये जगभरातील 32 संघ सहभागी होणार आहेत. आतापर्यंत खेळले गेलेले सर्व विश्वचषक जून आणि जुलै महिन्यात खेळवले गेले आहेत, परंतु कतारचे हवामान आणि उष्णता लक्षात घेता यंदाचा विश्वचषक नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ठेवण्यात आला आहे.

पहिला विश्वचषक 1930 मध्ये उरुग्वे येथे खेळला गेला आणि यजमान संघ उरुग्वेने जिंकला. महायुद्धामुळे 1942 आणि 1946 मध्ये विश्वचषक होऊ शकला नाही, परंतु त्यानंतर दर चार वर्षांच्या अंतराने फिफा विश्वचषक खेळला जातो.

कुठे होणार उद्घाटन सोहळा

विश्वचषकाचा पहिला सामना कतार आणि इक्वेडोर यांच्यात भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता होणार आहे. त्याच वेळी, उद्घाटन सोहळा दोहापासून 40 किमी अंतरावर असलेल्या अल-बैत स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.

कोण परफॉर्म करणार

दक्षिण कोरियन बँड BTS हे उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. BTS सदस्य जंगकूक प्रथमच विश्वचषकाच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीही परफॉर्म करणार आहे.

यासोबतच अमेरिकन बँड ब्लॅक आयड पीस, कोलंबियन गायक जे बाल्विन, नायजेरियन गायक पॅट्रिक ननेमेका ओकोरी आणि अमेरिकन रॅपर लिल बेबी परफॉर्म करणार आहेत.

आता खाली दिलेल्या ग्राफिक्समध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हे सामने कुठे खेळले जातील, कोणते देश आतापर्यंत चॅम्पियन झाले आहेत, कोणता संघ कोणत्या गटात आहे आणि यासोबतच तुम्हाला अनेक मजेदार तथ्येही आपल्याला कळतील…

बातम्या आणखी आहेत...