आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्राझीलचे डॅनिएल स्ब्रुझी हे ही जगातील एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी 11 फिफा विश्वचषक स्पर्धा बघितल्या आहेत. विशेष म्हणजे या कामगिरीसाठी त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. डॅनिएल म्हणतात की फिफा स्पर्धा ही विविध संस्कृतींचा अनुभव घेण्याची संधी आहे.
1978 मध्ये पहिला विश्वचषक पाहिला
डॅनिएल 75 वर्षांचे आहेत. अर्जेंटिना येथे 1978 मध्ये त्यांनी पहिल्यांदा फिफा विश्वचषक सामना पाहिला. यानंतर त्यांनी ब्राझीलच्या फुटबॉल संघाला सपोर्ट करण्यासाठी जगभर प्रवास केला. आता त्यांनी कतारमधील विश्वचषक स्पर्धा बघितली आहे. डॅनिएल यांनी आतापर्यंत फक्त एकच स्पर्धा चुकवली आहे, जी 1982 मध्ये स्पेनमध्ये झाली होती. त्यांनी सांगितले की ते 12 व्या विश्वचषकासाठी खूप उत्सुक आहे आणि त्यासाठी तयारी करत आहे.
महिलांचा पोशाख परिधान करून सामने बघिले
डॅनिएल हे फिफा स्पर्धेचे मोठा चाहते आहेत. पहिल्या विश्वचषकात ते वधूच्या वेशात सामना पाहण्यासाठी आले होते. त्यांची अशी समजूत होती की हा पेहराव ब्राझीलचे सर्वोत्तमरित्या प्रतिनिधित्व करतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी झालेल्या संवादात डॅनिएल यांनी सांगितले की, तेव्हापासून ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कपड्यांमध्ये मॅच बघायला जायला लागले. महिलांचे हे कपडे स्पर्धेचे यजमान देश आणि ब्राझीलचे प्रतिनिधित्व करतात.
डॅनिएल यांना कतारमध्ये हा ड्रेस घालता आला नाही
डॅनिएल यांनी मुलाखतीत सांगितले की, कतारमधील सामना पाहण्यासाठी त्यांना चार दशकांची प्रथा मोडावी लागली. कारण येथे महिलांचे कपडे घालणे त्यांना अडचणीत आणणारे ठरले असते. या स्पर्धेसाठी त्यांनी अरब देशांमध्ये परिधान केला जाणारा खास झगा घेतला. डॅनिएल यांनी फिफा विश्वचषक स्पर्धा पाहिल्या आहेत त्या सर्व देशांच्या ध्वजांचे भरतकाम यावर केलेले होते.
डॅनिएल यांनी सांगितले की, महिलेचे कपडे परिधान केल्यामुळे ते रशियात अडचणीत सापडले होते. 2018 च्या स्पर्धेत त्यांना रशियन सुरक्षा रक्षकांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापासून रोखले होते. डॅनिएलचे रूप पाहून ते हसत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.