आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा फुटबाॅल विश्वचषक:शेवटच्या मिनिटांमध्ये दाेन गाेल; हाॅलंडची सेनेगलवर 2-0 ने मात

दोहा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाॅलंड आणि सेनेगेल यांच्यातील रंगतदार सामना ८४ व्या मिनिटापर्यंत शून्य गाेलने बराेबरीत राहण्याचे चित्र हाेते. एकीकडे इंग्लंड आणि इराण संघांतील सामन्यात गाेलचा पाऊस पडला, तर दुसरा सामना शून्य गाेलने बराेबरीत राहण्याची शक्यता वर्तवली जात हाेती. मात्र, काेडी गाकपाे (८४ वा मि.) आणि डेव्हिड क्लासन (९०+९ वा मि.) यांनी सामन्याला कलाटणी दिली. त्यांनी शेवटच्या मिनिटांमध्ये प्रत्येकी एक गाेल केला. यासह हाॅलंड संघाने रंगतदार सामन्यात २-० ने सेनेगेल टीमवर मात केली. काेडीने विश्वचषकात गाेलचे खाते उघडले. त्याने सेनेगलच्या गोलकीपर एडुआर्ड मेंडीला हुलकावणी देत गाेल केला. तसेच क्लासेनने अतिरिक्त वेळेत गाेल केला. त्यामुळे संघाला विजय मिळवता आला.

बातम्या आणखी आहेत...