आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Fifa World Cup Final Top Moments; President Macron Arrives On Field | Fifa World Cup

भावुक एम्बाप्पेला सावरण्यासाठी राष्ट्रपती मॅक्रॉन मैदानावर:विजयानंतर मेसीचा टेबलवर डान्स, PHOTOS मध्ये टॉप मोमेंट्स

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून अर्जेंटिना फुटबॉलचा नवा बादशहा बनला आहे. त्यांनी 3-3 अशा बरोबरीनंतर रविवारी रात्री उशिरा पेनल्टी शूटआऊटमध्ये मागील विश्वचषक विजेत्या फ्रान्सचा पराभव केला. अर्जेंटिना 36 वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन बनले.

अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. मेसीने पहिला गोल पेनल्टीच्या जोरावर केला. दुसरा गोल एंजल डी मारियाने केला. पण, उत्तरार्धात कायलियन एम्बाप्पे मारक ठरला. त्याने अवघ्या 97 सेकंदात दोन गोल करत फ्रान्सला सामन्यात परत आणले. त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. पहिली 15 मिनिटे गोलरहित गेली, पण पुढच्या 15 मिनिटांत मेसीने गोल करून अर्जेंटिनाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एम्बाप्पेने पेनल्टी मारून सामना ३-३ असा बरोबरीत आणला. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली. यासह फुटबॉलमधील युरोपची जादू 20 वर्षांनंतर खंडित झाली. ट्रॉफी युरोपच्या बाहेर गेली.

PHOTOS मध्ये पाहा सामन्याचे टॉप मोमेंट्स

फ्रान्सच्या पराभवानंतर राष्ट्राध्यक्ष खेळाडूंना समजावण्यासाठी मैदानावर पोहोचले
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी अर्जेंटिनाकडून झालेल्या पराभवानंतर फ्रेंच फुटबॉल संघाचे सांत्वन केले. पेनल्टी शूटआऊटमध्ये तणावपूर्ण पराभवानंतर मॅक्रॉन फ्रेंच खेळाडूंना भेटण्यासाठी मैदानात उतरले. त्याचे अनेक फोटोही व्हायरल होत आहेत. यापैकी एका फोटोमध्ये मॅक्रॉन फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेला समजावताना दिसत आहेत. फ्रान्सच्या सामन्यात एम्बाप्पेने हॅट्ट्रिक केली, पण ती संघासाठी कामी आली नाही.

मेसीने पेनल्टीवर गोल केला
या सामन्यात अर्जेंटिनाने सुरुवातीपासूनच फ्रान्सवर दडपण ठेवले. सामन्याच्या 21व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या एंजल डी मारियाने चेंडूसह फ्रेंच पेनल्टी बॉक्सकडे धाव घेतली. बॉक्सच्या आत जाण्यासाठी त्याने डावीकडे धाव घेतली. पण, फ्रान्सच्या उस्माने डेम्बेलेने त्याला फाऊल केले. फाऊलनंतर रेफ्रींनी अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. मेसीने पेनल्टी घेत चेंडू नेटच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात धाडला.

गोल केल्यानंतर एंजल डी मारियाला अश्रू अनावर
36व्या मिनिटाला फ्रेंच गोलकीपर ह्युगो लॉरिसने एंजल डी मारियाच्या दिशेने धाव घेतली. पण डी मारियाने गोलच्या दिशेने फटकेबाजी केली. चेंडू थेट नेटमध्ये गेला आणि अर्जेंटिनाच्या बाजूने स्कोअर 2-0 असा झाला. गोल केल्यानंतर डी मारियाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अश्रू अनावर झाले. संघाच्या सर्व खेळाडूंनी गोलसाठी त्याचे अभिनंदन केले.

जिरुड आणि डेम्बले 41व्या मिनिटाला बाद झाले
2 गोलने पिछाडीवर पडल्यानंतर फ्रान्सला आपली रणनीती बदलावी लागली. याच कारणामुळे मॅनेजरने आपला स्टार स्ट्रायकर ऑलिव्हियर जिरुड आणि विंगर उस्माने डेम्बले यांना 41व्या मिनिटालाच मैदानाबाहेर बोलावले. त्यांच्या जागी विंगर्स मार्कस थुराम आणि मुआनी आले. जिरुड आणि उस्माने डेम्बले यांची सुरुवातीची एक्झिट आश्चर्यकारक होती कारण दोघेही फुटबॉलचे मोठे चेहरे आहेत.

सामन्याच्या सुरुवातीला ह्युगो लॉरिसला दुखापत झाली
अर्जेंटिनाने 11व्या मिनिटाला कॉर्नर घेतला. यादरम्यान अर्जेंटिनाच्या रोमेरोची फ्रान्सचा गोलरक्षक ह्युगो लॉरिसशी चकमक झाली. यानंतर काही काळ लॉरीस मैदानातच पडून राहिला. वैद्यकीय पथक आल्यानंतर त्याने खेळ सुरु केला.

एम्बाप्पेचे 100 सेकंदात दोन गोल
फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने खेळ बदलला. एम्बाप्पेने 2-0 ने पिछाडीवर असलेल्या फ्रान्सला पुन्हा सामन्यात आणले. पहिले पेनल्टी घेतली. यानंतर, 82 व्या मिनिटाला एम्बाप्पेने आपला दमदार खेळ दाखवत सामन्यातील दुसरा गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला.

जिरुडला बसल्या-बसल्या पिवळे कार्ड मिळाले
90+5व्या मिनिटाला रेफ्रींनी अर्जेंटिनाला फ्री किक दिली. या निर्णयामुळे संतप्त झालेला ऑलिव्हर जिरुड मैदानावर आला. यावेळी रेफ्रींनी त्याला नियम तोडल्याबद्दल पिवळे कार्ड दिले.

मेसीचा शेवटच्या क्षणी गोल
लिओनेल मेसीने 108व्या मिनिटाला गोल केला. तिसरा गोल करून अर्जेंटिनाच्या संघाने 3-2 अशी आघाडी घेतली. यावेळी सर्व चाहत्यांना हा सामना अर्जेंटिनाच्या खिशात असल्याचे जाणवले.

एम्बाप्पेने बरोबरी साधली
अर्जेंटिनाच्या गोन्झालो मॉन्टिएलने 118व्या मिनिटाला फाऊल केला. चेंडू त्याच्या हाताला लागला. त्यामुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली. ही संधी न गमावता कायलियन एम्बाप्पेने आपला आणि संघाचा तिसरा गोल करून सामना पुन्हा ३-३ असा केला.

शेवटच्या मिनिटाला मार्टिनेझने बचाव केला
फ्रान्सने पलटवार केला. दरम्यान, अर्जेंटिनाचा बचावपटू ओटामेंडीने चेंडू मारला पण चेंडू फ्रान्सच्या कोलो मुआनीपर्यंत पोहोचला. तो एमिलियानो मार्टिनेझसमोर होता. कीपर बाहेर आला आणि त्याने अविश्वसनीयपणे शॉटचा बचाव केला.

अर्जेंटिनाची विजयी पेनल्टी
अर्जेंटिनासाठी शेवटच्या पेनल्टीवर गोन्झालो मोंटालेने गोल केला. या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने विजय मिळवला.

बातम्या आणखी आहेत...