आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • FIFA World Cup, France Start Like A Champion, France Beat Australia 4 1 In The First Match Of The Group Stage.

फिफा वर्ल्ड कप:फ्रान्सची चॅम्पियनसारखी सुरुवात, साखळी फेरीत फ्रान्सची पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियावर 4-1 ने मात

अल वकरा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्सने विश्वचषकातील आपले अभियान मोठ्या विजयाने सुरू केले. सध्याचा चॅम्पियन फ्रान्सने ऑस्ट्रेलियाला ४-१ ने हरवले. तो किताबाचा दावेदार असल्याचे दाखवून दिले. फ्रान्सने चॅम्पियनसारखा खेळ खेळत सुरुवातीलाच सामन्यावर वर्चस्व मिळवले. संघaाच्या आड्रियन राबियोने २७ व्या, ऑलिव्हियर जिरूने ३२ व्या व ७१ व्या आणि किलियन एमबापेने ६८ व्या मिनिटाला गोल केला. जिरूने दुसरा गोल हेडरद्वारे केला व फ्रान्सचा सर्वाधिक गोल करणारा थिएरे हेन्रीशी बरोबरी केली. जिरूचे ११५ सामन्यात ५१ गोल झाले, तर हेन्रीने १२३ सामन्यात ५१ गोल केले आहेत. प्रशिक्षक डिडियर डेस्चॅप्सच्या रणनीतीनुसार, जिरू हा करीम बेंझेमाचा बॅकअप खेळाडू होता. मात्र, बेंझेमा बाहेर झाल्याने जिरूला आघाडीवर खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने स्वत:ला सिद्ध केले. फ्रान्सचा संघ विश्वचषकापूर्वी व आताही जखमी खेळाडूंमध्ये त्रस्त आहे. डिफेंडर किम्पेबे, कॉन्टे, पोग्बा व स्ट्रायकर क्रिस्टोफर दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत.

जर्मनीचा धक्कादायक पराभव, जपान विजयी फिफा विश्वचषक २०२२ साखळी सामन्यात जपानने धक्कादायक निकाल नोंदवला. बुधवारी २०१४ च्या विश्वविजेत्या जर्मनीचा जपानने ई गटातील सामन्यात पराभव केला. कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात आशियाई संघाने सर्व दिग्गजांच्या अपेक्षा आणि अनुमानांना धुडकावून लावत युरोपियन दिग्गजांचा २-१ असा पराभव करून खळबळ उडवून दिली. जर्मनी सामन्यात पहिल्या हाफपर्यंत १-० ने आघाडीवर असतानाही पराभूत झाला. जपानने दुसऱ्या हाफमध्ये आक्रमक कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य वेधले. जपानच्या रित्सू दोआनने ७५ व्या आणि तकुमा असानोने ८३ व्या मिनिटाला गोल केला. त्यापूर्वी जर्मनीच्या एल्काई गुंडोअनने ३३ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला होता.

बातम्या आणखी आहेत...