आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता फुटबॉलचा थरार:​​​​​​​फिफा वर्ल्डकप आजपासून, 32 संघ सहभागी, 18 डिसेंबरला मिळणार चॅम्पियन

दोहा (कतार)13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबाॅलप्रेमींचा महाउत्सव फिफा वर्ल्डकप रविवारपासून सुरू होत आहे. प्रेक्षकांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत ३२ संघांचे एकूण ८३२ खेळाडू भाग घेत आहेत. २९ दिवसांत एकूण ६४ सामने होतील, त्यात १० दिवस ४-४ सामने आहेत. फायनल १८ डिसेंबरला लुसैल स्टेडियममध्ये होईल. भारतीय संघ स्पर्धेत भलेही खेळत नसला तरी आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्‌घाटन समारंभात सहभागी होतील.

आतापर्यंत २१ फिफा वर्ल्डकप झाले आहेत. ब्राझील सर्वाधिक ५ वेळा, जर्मनी व इटली ४-४, अर्जेंटिना-फ्रान्स व उरुग्वे २-२, आणि इंग्लंड व स्पेन प्रत्येकी एकदा चॅम्पियन ठरले. फ्रान्स गतविजेता होता.

वर्ल्डकपमधील रेकॉर्ड, नवे रँकिंग, सट्टेबाजार, प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजयाच्या टक्केवारीच्या आधारावर हा अंदाज व्यक्त करण्यात आला.ब्राझील सर्वात प्रबळ दावेदार आहे.

व्ह्यूअरशिप... 500 कोटी प्रेक्षक, पूर्वीपेक्षा दीड पट {ब्रॉडकास्टिंग एक्स्पर्टनुसार, यंदा सुमारे ५०० कोटी लोक फिफा पाहतील. २०१८ च्या वर्ल्डकपमध्ये हा आकडा ३५० कोटी होता.{कतारला फिफातून १.५ ते २ लाख कोटी रु.पर्यंत कमाईची अपेक्षा. {२.५ कोटी लोकांनी तिकिटासाठी अर्ज केलेला आहे.

बक्षिसांची रक्कम 3.6 हजार कोटी, आयपीएलच्या 80 पट {फिफाची बक्षिसांची एकूण रक्कम ~ ३.६ हजार कोटी आहे. आयपीएलची एकूण बक्षीस रक्कम ४६.५ कोटीच होती, म्हणजे त्यापेक्षा ८० पट जास्त. {विजेत्याला सुमारे ३५९ कोटी आणि उपविजेत्यास २४५ कोटी मिळतील. {तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संघांना २२० व २०४ कोटी मिळतील. {३२ व्या म्हणजे शेवटच्या स्थानावरील संघालाही ७३ कोटी मिळतील.

बातम्या आणखी आहेत...