आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकतारच्या लुसेल स्टेडियमवर काही वेळातच फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना फ्रान्सशी झाला. यात पेनल्टी शुटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव झाला. तर अर्जेंटिना विश्वविजेता ठरला. विशेष बाब म्हणजे या सामन्यात जगातील दोन सर्वात मोठ्या स्पोर्ट्सवेअर कंपन्यांमध्ये देखील ही लढाई झाली आहे. आता तुम्ही म्हणाल की, ते कसं काय.
कारण गेल्या कित्येक वर्षांपासून Adidas ही स्पोर्टसवेअर कंपनी अर्जेंटिना राष्ट्रीय संघाचे प्रायोजक आहे. तर फ्रान्सला Nike Inc कंपनीची स्पॉन्सरशीप मिळते. त्याचवेळी यंदाच्या विश्वचषकात सहभागी असलेल्या एकूण 32 संघांपैकी 13 संघांना Nike आणि 7 संघांना Adidas ने प्रायोजकत्व दिले होते.
Nike कंपनीने अदिदासला मागे टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. Nike कंपनीने त्यांच्या क्रीडा प्रतिस्पकर्ध्याशी आतापर्यतंचा सर्वात मोठा फरक दिला आहे. गेल्या अनेक दशकांपासून अदिदास ृहे विश्वचषकाच्या किट्सवर प्रथम नाव आहे. जर्मनीनमध्ये 1974 च्या फिफा विश्वचषकात अदिदासने 16 पैकी 9 संघांना स्पॉन्सरशिप केले होते आणि या विश्वचषकापर्यंत अदिदासचे वर्चस्व कायम राहीले आहे.
अर्जेंटिनाच्या जर्सीला प्रचंड मागणी
फिफा विश्वचषक फायनलपूर्वी अर्जेंटिनाचा सॉकर स्टार लिओनेल मेसीच्या जर्सीची मागणी पूर्ण करण्यासाठी आदिदासनेही संघर्ष केला. मेसीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा विश्वचषक सामना असणार आहे. अदिदास वेबसाइटवर अर्जेंटिना होम जर्सी आणि अवे जर्सीची किंमत 4,999 रुपये आहे. आणि Nike जर्सीची किंमत 4,695 रुपये आहे.
1974 मध्ये प्रथमच जर्सीवर लोगो
किट परवाना करार 30 डॉलर अब्ज जागतिक परवानाकृत क्रीडा व्यापारी बाजारपेठेतील वाटा मिळविण्यासाठी आवश्यक आहे. 1974 पर्यंत, 48 वर्षांपूर्वी, विश्वचषकात संघाच्या जर्सीवर कोणत्याही ब्रँड डिस्प्लेला परवानगी नव्हती. आदिदास 1974 च्या विश्वचषकापासून 134 संघांसाठी जर्सी प्रायोजक राहीला आहे. 63 राष्ट्रीय संघांसह Nike हा दुसरा सर्वात मोठा ब्रँड आहे.
स्पॉन्सरशिपमधून कंपन्या कमाई कशी करतात?
जागतिक प्रेक्षक पोहोचण्यासाठी फायदेशीर
FIFA सारख्या स्पर्धा ब्रँडना जागतिक पातळीवर पोहोचविण्यास मदत करतात. निल्सनच्या विश्लेषणानुसार, 7 प्रदेश आणि 20 उद्योगांमधील 100 प्रायोजकत्वामुळे फॅनबेस खरेदीच्या हेतूमध्ये सरासरी 10% वाढ झाली आहे. त्यामुळे, जागतिक प्रेक्षकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि ब्रँड तयार करण्यासाठी कंपन्यांसाठी वर्ल्ड कप प्रायोजकत्व फायदेशीर ठरतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.