आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Fight Draw; Switzerland's Win, Cameroon's Loss Against Switzerland; Belgium Beat Canada 1 0

फिफा वर्ल्ड कप - गटातील सामने:लढत तुल्यबळ; विजय स्वित्झर्लंडचाच,  स्वित्झर्लंड संघाविरुद्ध कॅमरूनचा पराभव

अल वकरा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत स्वित्झर्लंड संघाने गुरुवारी विजयाचे खाते उघडले. संघाने गटातील सामन्यात तुल्यबळ कॅमरूनला धूळ चारली. स्वित्झर्लंड संघाने रंगतदार सामना १-० ने जिंकला. दुसऱ्यांदा विश्वचषकात सहभागी झालेल्या एमबाेलाेने (४८ वा मि.) सामन्यात निर्णायक गाेल केला. जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानी असलेल्या स्वित्झर्लंडला एकतर्फी विजय साजरा करता आला. कॅमरून संघाला विश्वचषकात सलग आठव्या पराभवाचा सामना करावा लागला. स्वित्झर्लंडने १२ व्यांदा सहभाग नाेंदवला. आफ्रिकन टीम कॅमरूनने आठव्यांदा विश्वचषकात सहभाग घेतला.

बेल्जियमचा १-० ने एकतर्फी विजय; बेटशुआईचा गाेल : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियम संघाने विश्वचषकातील आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. बेल्जियम संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात एकतर्फी विजय साजरा केला. संघाने सामन्यात कॅनडावर १-० ने मात केली. मिची बेटशुआईने (४४ वा मि.) सामन्यात गाेल करून आपल्या बलाढ्य बेल्जियम संघाला विजय मिळवून दिला.

24 गाेल स्वित्झर्लंड संघाने आतापर्यंतच्या चार मेजर स्पर्धांमध्ये (युराे कप आणि विश्वचषक) केले आहेत. यामध्ये ५० टक्के थेट सहभाग जेरदार शकीरीचा हाेता. त्याच्या नावे ८ सामन्यांत चार गाेलची नाेंद.

6 व्या विश्वचषकामध्ये स्वित्झर्लंड फुटबाॅल संघाने दमदार विजयी सलामी दिली. टीमचे ३ विजय व ३ सामने ड्राॅ.

बातम्या आणखी आहेत...