आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर्मनी, स्पेनसारख्या दिग्गज संघांना नमवल्यानंतर जपान क्रोएिशयाकडून पराभूत होत वर्ल्डकपमधून बाहेर झाला. हा यंदाच्या वर्ल्डकपचा सर्वात दीर्घ सामना होता. कारण ९० मिनिटांपर्यंत १-१ अशी बरोबरी होती. अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळातही निकाल लागला नाही. अखेर पेनल्टी शूटआउटमध्ये क्रोएिशया ३-१ ने जिंकला.
आतापर्यंत ४ आशियाई संघ स्पर्धेबाहेर {जपानसह ५ आशियाई संघ यंदाच्या वर्ल्डकपसाठी पात्र ठरले होते. हा आकडा १९३० नंतर सर्वाधिक आहे. आतापर्यंत ४ संघ बाहेर झाले आहेत. आता स्पर्धेत एकमेव आशियाई संघ द. कोरिया आहे. १९८६ पासून लागोपाठ दहाव्यांदा वर्ल्डकप खेळणारा कोरिया हा एकमेव आशियाई संघ आहे.
अविस्मरणीय झुंज : आकडेवारीत जपान खूप मागे , परंतु मैदानावर क्रोएशियाशी कडवी झुंज क्रोएशियन जपानी फिफा रँँकिंग 12वे 24वे आंतरराष्ट्रीय गोल 129 90 सरासरी मूल्य (~) 3,281 काेटी 1,339 काेटी सरासरी उंची 6 फूट 2 इंच 5 फूट 8 इंच सरासरी वय 27.4 वर्ष 27.8 वर्ष
सामन्यात चेंडूवर 59% ताबा क्रोएशियाचा होता {वर्ल्डकपसाठी 1954 पासून प्रयत्न करणारा जपान चौथ्यांदा टॉप-16 मध्ये पोहोचला, मात्र यंदाही उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयशी ठरला.
{पहिला गोल जपानने केला. त्यामुळे गत उपविजेता क्रोएशियावर दडपण वाढले परंतु त्यांनी लवकर दबाव झुगारला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.