आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामूळ पुणेकर असलेली लिसा स्थळेकर आता फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनचे (फिका) नेतृत्व करणार आहे. तिची फिकाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान होणारी लिसा ही पहिली महिला ठरली. स्वित्झर्लंडमधील नियोजन येथे नुकतीच फिकाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकरच्या नावाची अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली.
त्यामुळे आता ती दक्षिण आफ्रिकन माजी फलंदाज बॅरी रिचर्ड्स, विंडीजचे ऑलराउंडर जिमी अॅडम्स, इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू विक्रम साेळंकी यांच्यानंतर या पदावर भूमिका बजावणार आहे.
मूळ भारतीय असलेल्या ४२ वर्षीय लिसाने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये जवळपास १८७ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. तिच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियन महिला संघ २०१० मध्ये विश्वविजेता ठरला होता. सुरेख कामगिरीमुळे तिला २००७ आणि २००८ मध्ये ऑस्ट्रेलियातील सर्वात्तम खेळाडूसाठी दिल्या जाणाऱ्या बेलिंडा क्लार्क पुरस्काराने गौरवण्यात आले होते. लिसा ही सध्या समालोचकाच्या भूमिकेत काम करत आहे. तिच्या आता फिकामधील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.