आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्डकप:पाक-इंग्लंडमध्ये फायनल ; आज मिळणार चॅम्पियन

मेलबर्न4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-२० वर्ल्डकपमध्ये रविवारी पाक-इंग्लंडमध्ये दु. १:३० वाजता अंतिम सामना होईल. १९९२ च्या वनडे वर्ल्डकपनंतर प्रथमच दोन्ही संघ फायनलमध्ये खेळतील. तेव्हा पाकिस्तान जिंकला होता.

टॉस मोठा फॅक्टर नाही... {पाकिस्तान २००९ मध्ये टी-२० चॅम्पियन बनला तेव्हा टॉस हरला होता. इंग्लंड २०१० मध्ये चॅम्पियन बनला, तेव्हा टॉस जिंकला होता. {१९८७ च्या वनडे वर्ल्डकपमध्येही पाक-इंग्लंड सामन्यात इंग्लंड जिंकला.

...मात्र पावसाचे संकट {रविवारी मेलबर्नमध्ये पावसाची ८०% शक्यता आहे, पण सामना होण्याची आशा आहे. {सामना झाला नाही तर सोमवारी राखीव दिवशी २-४ तासांचा सामना होऊ शकतो. तरीही पाऊस आल्यास चषक विभागून द्यावा लागेल.

दोन ‘बी’मध्ये मोठी टक्कर; बाबर, बटलरसमोर आव्हान... टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दोन ‘बी’ म्हणजेच बाबर आणि बटलर दोघेही आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, दोघांसमोरही गोलंदाजांचे मोठे आव्हान असेल. त्यामुळे या अंतिम सामन्यात तुल्यबळ झुंज अपेक्षित आहे. सविस्तर - स्पोर्ट्स

बातम्या आणखी आहेत...