आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅर्डर-गावसकर कसाेटी मालिका:अखेर उस्मान ख्वाजाचे भारतामध्ये आगमन; आजपासून करणार सराव

बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाच्या उस्मान ख्वाजाचे अखेर भारतामध्ये गुरुवारी रात्री उशिराने आगमन झाले. व्हिसामधील टेक्निकल अडचणीमुळे त्याचा भारत दाैरा अडचणीत सापडला हाेता. मात्र या अडचणी वेळीच मार्गी लागल्याने त्याचा दाैरा सुकर झाला आहे. यातून ताे आता गुरुवारी मध्यरात्री थेट बंगळुरूमध्ये दाखल झाला आहे. येत्या ९ फेब्रुवारीपासून टीम इंडिया व ऑस्ट्रेलिया यांच्यातील बाॅर्डर-गावसकर कसाेटी मालिकेला सुरुवात हाेत आहे. या चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेला नागपूरच्या मैदानावर सुरुवात हाेत आहे. येथील व्हीसीए मैदानावर सलामीच्या कसाेटीला सुरुवात हाेणार आहे. याच कसाेटी मालिकेच्या तयारीसाठी सध्या पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर कसून सराव करत आहे. येथे चार दिवसांच्या सराव सेशननंतर ऑस्ट्रेलिया संघ नागपूरमध्ये दाखल हाेणार आहे. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलिया संघ कसून सराव करत आहे. ऑस्ट्रेलिया संघाने २००४ पासून आजपर्यंत भारत दाैऱ्यावर कसाेटी मालिका विजय साजरा केलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...