आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांशू ठरला चॅम्पियन:सत्रात पहिला भारतीय किताब विजेता

आेरलियन्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा युवा बॅडमिंटनपटू प्रियांशू राजावत रविवारी सत्रामध्ये पहिल्या किताबाचा मानकरी ठरला. त्याने आेरलियन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. भारताच्या २१ वर्षीय बॅडमिंटनपटूने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत ४९ व्या स्थानावर असलेल्या मॅग्नस जाेहान्सेनचा पराभव केला. त्याने २१-१५, १९-२१, २१-१६ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह ताे सत्रात पहिल्या विजेतेपदाचा मानकरी ठरला. त्याने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या पदार्पणात चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला.