आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशविरुद्ध चांगली सुरुवात केली. दिवस अखेर भारताने ६ बाद २७८ धावा काढल्या. सलामीवीर विशेष काही करू शकले नाहीत. कर्णधार लोकेश राहुलने ५४ चेंडूंत ३ चौकारांसह २२ धावा केल्या, तर शुभमन गिल (४०) मोठी खेळी करू शकला नाही. चेतेश्वर पुजाराने ९० धावा करत संघाचा डाव सावरला. मात्र, त्याचे शतक हुकले. पुजारा तिसऱ्यांदा नर्व्हस नाइंटीजचा शिकार बनला. यापूर्वी तो २५ ऑगस्ट २०२१ रोजी लीड्सवर इंग्लंड विरुद्ध ९१ धावांवर बाद झाला होता. पुजाराचे कसोटीत ६८८२ धावा पूर्ण झाल्या. तो कसोटी ६८००+ धावा करणारा आठवा भारतीय फलंदाज बनला. तैजुलने ३ बळी घेतले.
या वर्षी तिन्ही प्रकारांत सर्वाधिक ५०+ धावा करणारा श्रेयस पहिला श्रेयस अय्यर (८२*) शतकाच्या अगदी जवळ आहे. त्याचबरोबर तो या वर्षी तिन्ही प्रकारांत ५०+ धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. श्रेयसने या वर्षी ३८ सामन्यांत ९५.५७ च्या स्ट्राइक रेटने १४८९ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. या प्रकरणात श्रेयसने कोहलीला मागे टाकले. कोहली दोन शतके व ११ अर्धशतकांसह दुसऱ्यास्थानी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.