आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Fitness Secret Of Milkha Singh : Give 10 Minutes Daily To The Body; All Diseases Start From Stomach; News And Live Updates

फ्लाईंग सिखचे फिटनेसबाबत विचार:ते म्हणायचे - जेवढी भूक आहे, त्यापेक्षा अर्धे खा, कारण सर्व आजार हे पोटातून सुरु होतात

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जर शरीरात रक्त वेगाने वाहत असेल तर रोगांचे प्रादुर्भाव होईल

भारताचे महान धावपटू 'फ्लाईंग सिख' म्हणजेच मिल्का सिंग यांचा वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. परंतु, वयाच्या 91 वर्षीदेखील त्यांची फिटनेसबाबतची आवड कमी झाली नाही. त्यांनी आपल्या हयातीत अनेक जागतिक विक्रम केले. त्यांच्यासाठी कोणती फिटनेस महत्वाची होती, हे त्यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले. ते म्हणाले होते की, बदल हे फक्त फिटनेसमधून येईल. मी जे कायी चालत फिरत आहे ते फक्त माझ्या फिटनेसमुळेच होत आहे.

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमवेत लष्कराच्या गणवेशात मिल्खा सिंग (डावीकडे).
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमवेत लष्कराच्या गणवेशात मिल्खा सिंग (डावीकडे).

जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा अर्धे खा. कारण जगातील सर्व आजार हे फक्त पोटातून सुरु होतात. त्यामुळे तुम्हाला जर चार भाकरी खायचे असेल तर त्यातील दोनच खा. जेवढे पोट कमी राहील तेवढे आपण तंदुरुस्त राहणार असल्याचे ते म्हणायचे. ते पुढे म्हणायचे की, चोवीस तासांत कमीत कमी 10 मिनटे खेळण्यासाठी मैदानात जायला हवे.

मिल्खा सिंग (उजवीकडे) 1960 च्या रोम ऑलिम्पिक दरम्यान.
मिल्खा सिंग (उजवीकडे) 1960 च्या रोम ऑलिम्पिक दरम्यान.

पार्क, रस्ते काहीही असो आपण दहा मिनटे वेगाने चालले पाहिजे. कारण जर शरीरात रक्ताचे प्रवाह द्रुतगतीने वाहिले तर ते रोगाचा प्रादुर्भाव तेवढ्याच ताकदीने करता येते. तुम्हालादेखील माझ्यासारखे डॉक्टरकडे जाण्याची कधीच गरज भासणार नाही. फक्त आपल्या आरोग्यासाठी दररोज दहा मिनटे देणे खूप आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...