आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Five Women Footballers Fight For Equal Pay; A Historic Victory After Six Years Marathi News

लढा:पाच महिला फुटबॉलपटूंचा समान वेतनासाठी लढा; सहा वर्षांनंतर ऐतिहासिक विजय

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

२२.०२.२०२२ हा दिवस अमेरिकन महिला फुटबॉलपटूंसाठी एेतिहासिक ठरला. याच दिवशी पुरुषांसारखेच महिला फुटबॉलपटूंनाही एकसमान वेतन देण्याचा एेतहासिक निर्णय जाहीर करण्यात अाला. यातून अमेरिकेमध्ये फुटबॉल फेडरेशन अाता १८५ काेटींचा सर्वात माेठा करार करण्याच्या तयारीत अाहे. समान वेतन देणार असल्याचे फेडरेशनने स्पष्ट सांगितले अाहे. यासाठी पाच महिला फुटबॉलपटूंनी अविरतपणे दिलेला लढा यशस्वी ठरला. यामध्ये मेगन रेपिनाे, अॅलेक्स माॅर्गन, कार्ली लाॅयड, बेकी साॅर ब्रेन अाणि हाेप साेलाेचा समावेश अाहे.याच पाच महिला फुटबॉलपटूंनी लैंगिक भेदभावातून वेतनातील दुजाभाव अाणि त्यातून मिळणाऱ्या वागणुकीविरुद्ध लढा उभारला. यासाठी त्यांनी थेट सहा वर्षे फेडरेशनविरुद्ध समान वेतनासाठीची मोहीम कायम ठेवली. कारण, त्यांना मिळणाऱ्या सर्वच सुविधांमध्ये दुजाभाव केला जात हाेता. त्यामुळे महिला अाणि पुरुषांच्या सुविधांमध्ये माेठे अंतर हाेते.

बातम्या आणखी आहेत...