आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबाॅल:यजमान भारतीय युवा संघाचा एकतर्फी विजय

मडगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या युवा फुटबाॅल संघाने घरच्या मैदानावर रविवारी आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात शानदार एकतर्फी विजय साजरा केला. यजमान भारताने सामन्यात १७ वर्षांखालील उझ्बेकिस्तान टीमचा पराभव केला. भारताने २-० ने सामना जिंकला. गुईटे (२९ वा मि.) आणि लालपेखलुआने (४५+२ वा मि.) प्रत्येकी एक गाेल करत संघाचा विजय निश्चित केला. फाॅर्मात असलेल्या काेरू सिंगने घरच्या मैदानावरील विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने दाेन्ही गाेलसाठी असिस्ट केले. त्यामुळे गुईटे आणि लालपेखलुआला गाेल करता आले. आता यजमान भारताचा या संघाविरुद्ध उद्या मंगळवारी दुसरा सामना रंगणार आहे. सध्या पाहुणा उझ्बेकिस्तानचा युवा संघ मैत्रीपूर्ण सामन्यासाठी भारत दाैऱ्यावर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...