आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबाॅल:चेल्सीकडून सात महिन्यांत काेच ग्रॅहम पाॅटरची हकालपट्टी

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरच्या मैदानावरील लाजिरवाणा पराभव जिव्हारी लागल्याने चेल्सी क्लबने तडकाफडकी ग्रॅहम पाॅटर यांची मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली. त्यांची सात महिन्यांपूर्वीच प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली हाेती. मात्र, यादरम्यान टीमला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत हाेता. नुकताच एस्टाेन व्हिला क्लबने २-० ने यजमान चेल्सीचा पराभव केला. यामुळे चेल्सीने काेच पाॅटर यांना बाजुला करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबला ३१ सामन्यांमध्ये ११ वेळा पराभवाला सामाेरे जावे लागले. दुसरीकडे लिस्टर क्लबने मॅनेजर ब्रेंडन राॅजर्सची हकालपट्टी केली.