आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Football Fans From All Over The World Come To Meet The Indian Abbas Kuri, With All The Records In Front Of Him

दिव्य मराठी विशेष:भारतीय अब्बास कुरींना भेटायला येतात जगभरातील फुटबॉल चाहते, सर्व सामन्यांचे विक्रम त्यांना तोंडपाठ

दोहा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा येथील सेंच्युरी नावाचे भारतीय रेस्टॉरंट फुटबॉल विश्वचषकादरम्यान प्रसिद्ध झाले आहे. पण, त्याच्या खाण्यासाठी नव्हे, तर त्याचा कर्मचारी अब्बास कुरी यांच्यामुळे. कतारमध्ये विश्वचषक पाहण्यासाठी आलेले अनेक देशांचे चाहते कुरीशी बोलण्यासाठीच या रेस्टॉरंटमध्ये येतात. कुरी हे भारतीय वंशाचे असून फुटबॉलचे चाहते आहेत. १९९० पासून फुटबॉल खेळलेल्या प्रत्येक संघाबद्दल आणि प्रत्येक खेळाडूबद्दल सर्व काही माहीत तोंडपाठ असलेला चाहता आहे. कुरी सांगतात की, रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या लोकांशी संभाषण सुरू करण्यासाठी ते आधी त्यांच्या देशाचे आणि नंतर त्यांच्या आवडत्या खेळाडूचे नाव विचारतात. मग ते लोकांशी फुटबॉलबद्दल बोलू लागतात. ते म्हणतात, “जेव्हा मी फुटबॉलबद्दल बोलतो तेव्हा प्रत्येक जण माझे ऐकतो.’ अब्बासचा आवडता संघ ब्राझील आहे, पण मॅराडोनामुळे तो फुटबॉल बघू लागला.

बातम्या आणखी आहेत...