आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Football : ISL From Today; 8 Months After The First Major Tournament In The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉल:आयएसएल आजपासून; देशातील पहिली मोठी स्पर्धा 8 महिन्यांनंतर, फुटबॉल इंडियन सुपर लीगचे सातवे सत्र गाेव्यात; मार्चपर्यंत तीन स्टेडियमवर सामने

पणजी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलामी सामना एटीके मोहन बागान व केरळा ब्लास्टर्स, वेळ : संध्या. ७.३० वाजेपासून
  • प्रेक्षकांना प्रवेश नाही, बायाे बबलमध्ये ११५ सामने

फुटबॉलच्या इंडियन सुपर लीग (अायएसएल) सुरुवातीसह देशात खेळ अाता अाज शुक्रवारी पुनरागमन करत आहे. त्यामुळे अायएसएलच्या माध्यमातून आठ महिन्यांनंतर भारतात पहिली मोठी स्पर्धा सुरू हाेत अाहे. काेरोनामुळे मार्चनंतर सर्व खेळ बंद होते. मात्र, गेल्या एक-दोन महिन्यांपासून काही स्पर्धा खेळवण्यात आल्या. यामध्ये इनडोअर व ऑनलाइन स्पर्धांचा अधिक समावेश होता. त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू नव्हते.

आयएसएलसारख्या मोठ्या स्तरावर होणाऱ्या स्पर्धा नव्हत्या. स्पर्धेत ११ संघ सहभागी असून पहिला सामना सध्याची चॅम्पियन एटीके मोहन बागान व केरळा ब्लास्टर्स यांच्यात खेळवला जाईल. ११५ सामन्यांनंतर पुढील वर्षी मार्चमध्ये लीगचा नवा चॅम्पियन मिळेल. यात चाहत्यांना प्रवेशबंदी आहे. त्यामुळे फॅन्स वॉल बनवण्यात आली आहे. सामन्यादरम्यान एलईडी स्क्रीन लावल्या जातील, ज्यामुळे चाहते लाइव्ह सामन्याचा आनंद घेऊ शकतील.

सत्रातील सर्वात मोठा सामना २७ नाेव्हेंबरला फातोर्दाच्या मैदानावर रंगणार अाहे. यासामन्यादरम्यान एटीके मोहन बागान व एससी ईस्ट बंगालच्या १०० वर्षे जुना संघर्ष असेल. मोहन बागान प्रथमच स्पर्धेत अापले नशिब अाजमावणार अाहे. त्यामुळे टीमची नजर पदार्पणातच किताब जिंकण्याकडे लागली अाहे. एटीकेने यंदाच्या सत्रात आय लीग क्लब मोहन बागानमध्ये विलय केला. एटीके सर्वाधिक तीन वेळचा चॅम्पियन आहे.

सर्व सामने गोव्यातील मैदानावरच रंगणार!
काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन महासंघाने यंदा अायएसएलचे सामने एकाच ठिकाणी अायाेजित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गाेवा राज्याची निवड करण्यात अाली. कारण, यजमान गाेव्यात सध्या काेराेनाच्या केसेस फारच कमी अाहेत. त्यामुळे यंंदालीगमधील सर्व सामने गोव्यातील फातोर्दा स्टेडियम, जीएमसी अॅथलेटिक्स स्टेडियम आणि टिळक मैदानावर होतील. आतापर्यंत झालेल्या सहा सत्रात घरच्या मैदानाचा सर्वाधिक फायदा बंगळुरू एफसीला झाला. त्यांची घरच्या मैदानावरील विजयाची सरासरी ६७ टक्के आहे.

अॅपद्वारे खेळाडूंवर असेल खास नजर!

कोरोनामुळे कडक नियम बनवण्यात आले आहेत. खेळाडूंच्या आरोग्यकडे लक्ष देण्यासाठी अॅप बनवण्यात आला असून, ज्यामध्ये दररोज आरोग्याबद्दल माहिती दिली जाईल. सर्व टीम जैवसुरक्षित वातावरणात राहतील. लीगसाठी एक मुख्य वैद्यकीय टीम बनवण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक फ्रँचायझीचे आपले वैयक्तिक डॉक्टर असतील. अॅपवर सर्व माहिती असेल. त्याचे पालन करून घेतले जाईल. लीगच्या या संपूर्ण सत्रामध्ये अाता खेळाडू, टीम ऑफिशियल इतरांच्या आरोग्य व सुरक्षेची खास जबाबदारी पार पाडणार अाहेत.

रकमेत ३.५ कोटींनी वाढ; विजेत्याला ८ काेटी
स्पर्धेची लाेकप्रियता अाणि खेळाडूंचा वाढता सहभाग लक्षात घेऊन अायाेजकांच्या वतीने अाता यंदापासून बक्षीस रक्कमेत माेठी वाढ करण्याची घाेषणा केली. त्यामुळे पुर्वी बक्षीस रक्कम १५ कोटी रुपये होती. आता वाढून १८.५ कोटी रुपये करण्यात आली. चॅम्पियनला ८ कोटी आणि उपविजेत्याला ४ कोटी रुपये दिले जातील. दुसरीकडे, दोन्ही उपांत्य फेरीतील टीमला १.५-१.५ कोटी रुपये मिळतील. सामनावीर, मालिकावीर, फिटेस्ट प्लेयर ऑफ द मॅच, एमर्जिंग प्लेयर ऑफ द मॅच आदी पुरस्कार दिले जातील.

बातम्या आणखी आहेत...