आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉल:अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू मॅराडोनाचे हृदयविकाराने निधन, आपल्या नेतृत्वात 1986 मध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते

ब्यूनस आयर्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे बुधवारी वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, मॅराडोनाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. २ आठवड्यांपूर्वीच त्याच्यावर मेंदूतील गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मॅराडोनाने ३० ऑक्टोबरला आपला ६० वा वाढदिवस साजरा केला होता. चार फिफा विश्वचषकात खेळलेल्या मॅराडोनाने आपल्या नेतृत्वात 1986 मध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ८ दिवसांत त्याला रुग्णालयात सुटी देण्यात आली होती. यानंतर तो घरीच विश्राम करत होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser