आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनचे आघाडीचे फुटबॉलपटू व लव्ह आयलँड रियॅलिटी चे स्टार्स आता गॅम्बलिंगचा प्रचार करणाऱ्या जाहिराती करू शकणार नाहीत. कमिटी फाॅर अॅडव्हर्टायझिंग प्रॅक्टिस (कॅपने) याबाबत मंगळवारी एक पत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एक ऑक्टाेबर २०२२ पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. ऑक्टाेबर २०२० मध्ये हे नियम तयार करण्यात आले हाेते. या नियमांचे आता पालन केले जाणार आहे.
नवा नियम खेळाडू व स्टारवर लागू करण्यात आला आहे. सोशल मीडियावर त्यांचे लाखाे फाॅलाेअर्स अाहेत. त्यांच्या चाहत्यांमध्ये मुले, तरुण, वयस्करांचाही समावेश आहे. गॅम्बलिंगचे आवाहन केल्यानंतर तरुण वर्ग त्याच्या जाळ्यात अडकू शकताे. या वर्गाला मानसिक व आर्थिक फटकाही बसू शकताे. हा नियम फुटबॉलपटू व लव्ह आयलँडच्या स्टार मंडळींना देखील लागू करण्यात आला आहे. गॅम्बलिंगच्या जाहिरातीत अनेकवेळा १८ वर्षांहून कमी वयाच्या मुलांचा सहभाग असताे. अशा जाहिरातींवरही बंदी घालण्यात आली आहे. याबराेबरच व्हिडिआे गेम व गेमप्लेसोबत प्रचारही करता येणार नाही. त्यासाठी कडक नियम लागू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारण त्या माध्यमातून विशिष्ट वयाच्या वर्गाला गॅम्बलिंगसाठी प्राेत्साहन दिले जात आहे.
पुढल्या महिन्यापासून कतारमध्ये स्पर्धा
कतारमध्ये ऑक्टाेबरमध्ये जागतिक फुटबॉल करंडक आयाेजित केला जाणार आहे. या आयाेजनामुळे परिसरातील लाेक जुगार, सट्ट्यासह इतर प्रलाेभने देणाऱ्या जाहिरातींवर खूप खर्च करतात. त्याचा फटका तरुण व लहान मुलांना बसताे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.