आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Football: PSG Away In Semi finals; The Possibility Of A Change Of Rules In The Next Season Of The Champions League Europa League

दिव्य मराठी विशेष:फुटबॉल : पीएसजी अवे गोलच्या आधारे उपांत्य फेरीत; चॅम्पियन लीग-युरोपा लीगच्या पुढील सत्रात नियम बदलाची शक्यता

पॅरिस/सेविले9 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • पीएसजीने चॅम्पियन बायर्न म्युनिचला हरवले, पोर्टोला पराभूत करत चेल्सी अंतिम ४ मध्ये

फ्रेंच फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) आणि इंग्लिश क्लब चेल्सी चॅम्पियन लीगच्या उपांत्य फेरीत पोहोचला. दोन्ही संघांनी आपापले दुसऱ्या लेगचे सामने गमावले. मात्र, पीएसजीने बायर्न म्युनिकवर अवे गोलच्या आधारे मात केली. दुसऱ्या लेगमध्ये सध्याचा चॅम्पियन बायर्नने पीएसजीला त्यांच्याच घरात १-० ने हरवले. मात्र, पीएसजीने गत आठवड्यात बायर्नला त्याच्या घरच्या मैदानावर ३-२ ने मात दिली होती. सामन्यात एकूण गोल ३-३ राहिले. म्हणजे, अवे गोलच्या आधारे पीएसजी विजयी ठरला. सामन्यात बायर्नसाठी एकमेव गोल एरिक मॅक्सिम चोपोने ४० व्या मिनिटाला केला. संघाला स्टार खेळाडू रॉबर्ट लेवानडोस्कीची उणीव जाणवली. गत सत्रात बायर्नने पीएसजीला पराभूत करत किताब जिंकला होता.

दुसरीकडे, युरोपियन युनियन ऑफ फुटबॉल असोसिएशन (युएफा) पुढील सत्रात चॅम्पियन लीग व युरोपा लीगमध्ये अवे गोलच्या नियमात बदल करू शकते. नव्या नियमानुसार, अवे गोल तेव्हा ग्राह्य धरला जाईल, जेव्हा दुसऱ्या लेगमध्ये निर्धारित वेळेत निकाल लागलेला असेल. सामना अतिरिक्त वेळेत खेळवण्यात आला, तर गोल ग्राह्य धरला जाणार नाही.

चेल्सी ७ वर्षांत प्रथमच उपांत्य फेरीत
पोर्तुगालचा क्लब एफसी पोर्टोने त्रयस्थ ठिकाणी (सेविले) दुसऱ्या लेगमध्ये चेल्सीला १-० ने हरवले. मात्र, सामन्यातील एकूण गोल २-१ चेल्सीच्या बाजूने राहिले. चेल्सीने सात वर्षांत प्रथमच लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. चेल्सी टीम एकूण अाठव्यांदा अंतिम-८ मध्ये खेळेल. चेल्सी सर्वाधिक आठ वेळा उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लिश संघ आहे.

  • ०३ तिसऱ्यांदा सलग सध्याचा चॅम्पियन बायर्न म्युनिक संघ लीगच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही.
  • २४ सामन्यांनंतर प्रथमच पीएसजी चॅम्पियन लीगमध्ये घरच्या मैदानावर गोल करू शकला नाही.
बातम्या आणखी आहेत...