आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामँचेस्टर युनायटेडने युराेपा लीगच्या क्वार्टर फायनलमधील अापला पहिला लेग जिंकला. इंग्लंडच्या या फुटबॉल क्लबने सामन्यात स्पॅनिश क्लब ग्रेनाडावर मात केली. मँचेस्टर युनायटेडने २-० अशा फरकाने सामना जिंंकला. मार्कस रेशफाेर्ड (३१ वा मि.) अाणि ब्रुनाे फर्नांडिस (९० वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल केला. यासह मँचेस्टर युनायटेडला एकतर्फी विजयाची नाेंद करता अाली. दुसरीकडे या दोघांनी सत्रामध्ये २० पेक्षा अधिक गाेल करण्याची कामगिरी अापल्या नावे नाेंद केली. अशा प्रकारे सत्रामध्ये २० पेक्षा अधिक गाेल करणारे खेळाडू हे युनायटेडचे नाेंद झाले. अशी कामगिरी करणारा हा एकमेव संघ ठरला. रेशफाेर्डने सलग तिसऱ्या सत्रामध्ये २० पेक्षा अधिक गाेल केले अाहेत. यातून ताे अाता वायने रुनीनंतर (२००८-०९ अाणि २००९-१०) युनायटेडचा पहिला फुटबॉलपटू ठरला अाहे.
युनायटेडने गत सामन्यामध्ये क्लीन शीट केले अाहे. म्हणजेच युनायटेडने सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी टीमचा अापल्याविरुद्ध गाेल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे युनायटेडने अापल्याविरुद्ध एकही गाेल न हाेऊ देता सामने जिंकले अाहेत.
स्लाव्हिया-अार्सेनल लढत बराेबरीत :
चेक गणराज्यच्या स्लाव्हिया प्राग क्लबने अटीतटीच्या सामन्यात अार्सेनलला बराेबरीत राेखले. त्यामुळे हा सामना १-१ ने बराेबरीत राहिला. अार्सेनलकडून निकाेलस पेपेने ८६ व्या मिनिटाला गाेल केला. त्यानंतर स्लाव्हिया प्रागसाठी थाॅमस हाेल्सने (९०+३ वा मि.) गाेल केला. यामुळे चेक गणराज्यच्या क्लबला सामना बराेबरीत ठेवता अाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.