आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Football Updates: The 12 Largest Football Clubs Came Together To Form The Largest League In The World; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:12 सर्वात मोठ्या फुटबॉल क्लबनी एकत्र येऊन स्थापन केली जगातील सर्वात मोठी लीग

लंडन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येक संघाला 3 हजार कोटी; नाराज ‘फिफा’चा बंदी घालण्याचा इशारा
  • नव्या युरोपियन सुपर लीगमध्ये 20 संघ ऑगस्टपासून खेळतील सामने, फ्रान्स-जर्मनीचे क्लब सहभागी नाहीत

जगात प्रसिद्ध असलेल्या युरोपमधील १२ सर्वात मोठ्या फुटबॉल क्लबनी रविवारी नवी ‘युरोपियन सुपर लीग’ स्थापन केली. तीत मँचेस्टर सिटी, युनायटेड बार्सिलोना, रिअल मॅड्रिड, एसी मिलान यांसारखे मोठे क्लब सहभागी झाले आहेत. तिचा उद्देश सध्याच्या सर्वात मोठ्या चॅम्पियन्स लीगला टक्कर देणे हा आहे. त्यामुळेच तिची बक्षिसाची रक्कमही चॅम्पियन्स लीगपेक्षा बरीच जास्त आहे. लीग ऑगस्टपासून सुरू होईल. तीत सहभागी प्रत्येक संस्थापक क्लबला सुमारे ३००० कोटी रुपये मिळतील, ही रक्कम २०२० मधील चॅम्पियन्स लीगच्या विजेत्यापेक्षा चार पट जास्त आहे. तिकडे, युरोपियन फुटबॉल असोसिएशन (यूएफए) आणि फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल एसोसिएशनने (फिफा) इशारा दिला आहे की, या लीगमध्ये सहभागी क्लबला देशांतर्गत, युरोपीय किंवा जागतिक स्तरावरील कुठल्याही स्पर्धेत खेळण्यावर बंदी घातली जाईल आणि त्यांच्या खेळाडूंना आपल्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळणार नाही.

या क्लबचे म्हणणे आहे की,कोरोना महामारीमुळे सध्याचे युरोपीय फुटबॉलचे आर्थिक मॉडेल डगमगले आहे. त्यामुळे आता युरोपीय फुटबॉलचा आराखडा मजबूत व्हावा आणि त्याचे मूल्य वाढावे अशा रणनीतिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनाची गरज आहे. याच व्यवस्थेत चॅम्पियन्स लीग प्रमुख आहे. टीव्ही आणि प्रायोजकत्वातून मिळणारे हजारो कोटी रुपये जगातील याच सर्वांत श्रीमंत क्लबला जातात आणि त्यांना तेवढीच भरभक्कम रक्कम चॅम्पियन्स लीगतर्फेही मिळते. नव्या सुपर लीग मॅडेलमध्ये चॅम्पियन्स लीगचे सर्वात आकर्षक आणि यशस्वी संघ त्याच्या नियंत्रणातून बाहेर होतील. म्हणजेच सर्वात श्रीमंत क्लबही स्पर्धेतून बाहेर होतील.

सुपर लीगच्या घोषणेअंतर्गत सुमारे ३४,००० कोटी रुपये ती स्थापन करणाऱ्या १२ क्लबमध्ये विभागले जातील. लीगअंतर्गत सुमारे २० संघ प्रत्येक सीझनमध्ये खेळतील. नव्या सुपर लीगच्या स्थापनेच्या हालचाली गेल्या वर्षीपासूनच सुरू झाल्या होत्या. कोरोना महामारीमुळे मोठ्या क्लबनी फुटबॉल उद्योगात निर्माण झालेल्या अनिश्चिततांचा फायदा घेण्यासाठी एका नव्या आर्थिक पर्यायाचा शोध सुरू केला होता. जे संघ या नव्या मार्गावर चालण्यास नकार देतील त्यांना त्यांच्या कमाईत तोटा व्हावा हाही हेतू होता. सध्यातरी फ्रान्स किंवा जर्मनीतील कुठलाही क्लब बाहेर पडलेला नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हा निर्णय फुटबॉलसाठी हानिकारक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

नव्या लीगशी संंबधित खेळाडूंत बहुतांश जण करारबद्ध, ६ क्लब इंग्लंडचे
युरोपियन सुपर लीगशी संबंधित १२ क्लबशी जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी बहुतांश जण करारबद्ध आहेत. या लीगमध्ये इंग्लंडचे ६ क्लब (आर्सेनल, चेल्सी, लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड आणि टॉटेनहॅम हाॅट्स्पर), स्पेनचे ३ क्लब (अॅटलॅटिको डी माद्रिद, बार्सिलोना एफसी आणि रिअल माद्रिद) तसेच इटलीचे ३ क्लब (एसी मिलान, इंटर मिलान आणि युव्हेंट्स) सहभागी होतील.


बातम्या आणखी आहेत...