आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर दोन आठवड्यांपूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. १९८६ मध्ये जागतिक विजेता बनवल्यानंतर मॅराडोना अर्जेंटिनाचा आयकॉन बनला होता. क्लासिक १० क्रमांकाची जर्सी घालणारा मॅराडोना ड्रिबलिंग स्किल व गोल बनवण्याच्या क्षमतेमुळे संघात नेहमी प्लेमेकरची भूमिका बजावत होता. ५ फूट ५ इंच अशी कमी उंची असलेला खेळाडू मॅराडोना फुटबाॅलच्या जगात आपल्या २ गोलमुळे नेहमी चर्चेत राहिला. हे दोन्ही गोल त्याने १९८६ च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध केेले. तो क्वार्टर फायनल सामना अर्जेंटिनाने २-१ ने जिंकला होता. त्या सामन्यात मॅराडोनाच्या एक गोलला “हँड ऑफ गॉड’ व दुसऱ्याला फिफाने “गोल ऑफ द सेंच्युरी’ म्हटले. मेक्सिकोमध्ये झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने प. जर्मनीला ३-२ ने हरवले होते. त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूला गोल्डन बूट मिळाला.
तिसऱ्या वर्षी खेळायला सुरू केले, १९८६ मध्ये उंचीवर पोहोचला
३० ऑक्टोबर १९६० ला ब्यूनस आयर्सच्या बाहेरच्या परिसरात एका छोट्याशा गरीब कुटुंबात मॅराडोनाचा जन्म झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी फुटबॉल खेळायला सुरू करणाऱ्या मॅराडोनाचे दोन छोटे भाऊ ह्यूगो व रॉल व्यावसायिक फुटबॉलपटू होते. त्याने १९७६ मध्ये आपल्या १६ व्या जन्मदिनाच्या १० दिवस आधी व्यावसायिक पदार्पण केले व १९८६ मध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचला. मॅराडोनाने अर्जेंटिनाकडून ९१ सामने खेळले व ३४ गोल केले. त्याने ४ विश्वचषक खेळले. त्याने ७ संघांकडून क्लब फुटबॉल खेळले व ८ संघांना मार्गदर्शन केले.
20 वर्षांपूर्वी प्लेअर ऑफ द सेंच्युरी
- फिफा वर्ल्ड कप गोल्ड बॉल 1986
- फिफा वर्ल्ड कप ऑल टाइम टीम 1994
- बेलेन डि ओर 1995
- 20 व्या शतकातील सर्वाेत्कृष्ट संघ 1998
- 20 व्या शतकातील सर्वाेत्कृष्ट खेळाडू 1999
- फिफा प्लेअर ऑफ द सेंच्युरी 2000
- फिफा गोल ऑफ द सेंच्युरी 2002
- फिफा 100 ग्रेटेस्ट लिव्हिंग प्लेअर 2004
- इटालियन फुटबॉल हाॅल ऑफ फेम 2014
- अर्जेंटिना-खेळासाठी मोठा वाईट दिवस आहे. ते आम्हाला सोडून गेले, मात्र ते गेले नाहीत, कारण दिएगो स्मरणात आहेत. मी त्यांच्यासोबत अनेक सुंदर क्षण घालवले. - लियोनेल मेसी
- आज मी एक चांगला मित्र व जगातील हुशार व्यक्तीला निरोप दिला. तो एक अद्वितीय खेळाडू होते. ते खूप लवकर गेले. त्यांच्या जाण्याने पाेकळी निर्माण झाली, जी कधी भरणार नाही. - क्रिस्टियानाे रोनाल्डो
- अशा प्रकारे एका मित्राला गमावणे दुःखद आहे. जगाने एका महान व्यक्तीला गमावले. निश्चितच एक दिवस आकाशात आम्ही सोबत फुटबॉल खेळू. - पेले, ब्राझीलचे फुटबॉलपटू
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.