आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाच्या व्यत्ययाने शेवटची निर्णायक लढत रद्द झाल्याने यजमान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-२० सामन्यांची मालिका २-२ ने बराेबरीत राहिली. दरम्यान, भारतीय संघाचा टी-२० फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एेतिहासिक मालिका विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. दुसरीकडे आफ्रिका संघाच्या भारताविरुद्ध सलग तिसऱ्या मालिका विजयाच्या आशेवरही पाणी फेरले गेले. पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. दरम्यान, मालिकेमध्ये यजमान भारतीय संघाकडून हार्दिक पंड्यासह भुवनेश्वरकुमार आणि अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकची कामगिरी काैतुकास्पद ठरली. यांच्या शानदार कामगिरीमुळेच संघाला सलगच्या दाेन सामन्यांतील पराभवानंतर दमदार पुनरागमन करता आले. याच खेळीमुळे टीम इंडियाने मालिकेत बराेबरी साधली. ऋषभच्या नेतृत्वाखाली यजमान टीम इंडियाला घरच्या मैदानावर नियमित कर्णधार राेहित शर्मासह विराट काेहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजासह अनेक दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये आफ्रिकेच्या आव्हानाचा सामना करावा लागला. याचा माेठा फटका भारताला सुरुवातीच्या दाेन्ही सामन्यांत बसला. युवा खेळाडू सपशेल अपयशी ठरल्याने टीम इंडियाला सलग दाेन्ही टी-२० सामन्यात धूळ चाखावी लागली. त्यानंतर हार्दिक, भुवनेश्वर व दिनेश कार्तिकने टीम इंडियाला पुनरागमन करण्याची संधी मिळवून दिली. त्यामुळे सलगच्या दाेन विजयांसह भारताने मालिकेत बराेबरी साधली.
दिनेश कार्तिकची भूमिका निश्चित; ऋषभवर संघ प्रवेशासाठी माेठा दबाव
दिनेश कार्तिकने खेळण्यासाठी मिळालेल्या संधीला सार्थकी लावले. त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये आता मालिकेत लक्षवेधी खेळी केली. त्यामुळेच त्याला या फॉरमॅटमध्ये १६ वर्षांनंतर आपल्या नावे पहिल्या अर्धशतकाची नोंद करता आली. याच अर्धशतकी खेळीतून त्याने संघाच्या विजयातही माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे त्याच्यावर काैतुकाचा वर्षाव करण्यात आला. मात्र, याच खेळीने आता ऋषभ पंतच्या समाेरील अडचणींमध्ये वाढ झाली. अपयशी ठरलेल्या ऋषभला आता आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची गरज आहे.
हर्षल पटेल आता भारतीय संघात चाैथा टी-२० स्पेशालिस्ट खेळाडू
भुवनेश्वरला गाेलंदाजीमध्ये युवा खेळाडू हर्षल पटेलची साथ मिळाली. त्यामुळेच त्यानेही संघाच्या दाेन विजयांत माेलाचे याेगदान दिले. त्याने नियमित अंतरात आक्रमक खेळीतून विकेट घेतल्या. यातूनच आता हर्षल पटेल हा भारतीय टी-२० संघामध्ये चाैथा स्पेशालिस्ट म्हणून आता समाेर आला आहे. त्याला मालिकेतील सुरुवातीच्या दाेन्ही सामन्यांत विकेटसाठी माेठी मेहनत घ्यावी लागली. मात्र, त्यानंतर ताे तिसऱ्या व चाैथ्या सामन्यात यशस्वी ठरला. तसेच बिग-हिटिंग पाॅवरच्या खेळीतून हार्दिकने संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यामुळेच त्याची कामगिरी ही संघासाठी प्लस पॉइंटसारखी ठरली.
ऋतुराज-श्रेयसने गमावल्या अनेक संधी; अक्षर पटेलकडून संघाची निराशा
ईशान किशनने झंझावाती फलंदाजी करून भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, यादरम्यान मिळालेल्या सलामीवीरांच्या संधीला ऋतुराज हा अपेक्षित असा न्याय देऊ शकला नाही. त्याला या भूमिकेत स्वत:ला सिद्ध करता आले नाही. यादरम्यान, त्याने अनेक संधी गमावल्या. याशिवाय श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलनेही संघाची निराशा केली. त्यामुळे आता श्रेयसला टी-२० संघात स्थान मिळवण्याठी माेठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. जडेजाच्या जागी संधी मिळालेला अक्षर पटेलही स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. दरम्यान, युजवेंद्र चहलने काही प्रमाणात यश संपादन केले.
टी-२० वर्ल्डकप : निवड समिती व काेचला संघनिश्चितीसाठी फक्त चार संधी
यंदा नाेव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. निवड समितीने सध्या आॅस्ट्रेलियात होणाऱ्या या विश्वचषकासाठी भारतीय संघ निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, यासाठी निवड समिती आणि प्रशिक्षकांकडे फक्त चारच संधी आहेत. यातूनच संघ निवड निश्चित केली जाणार आहे. टीम इंडिया आता २६ व २८ जून राेजी आयर्लंडविरुद्ध दाेन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. याशिवाय विंडीज दाैऱ्यावरही टी-२० फाॅरमॅटच्या मालिकेचे आयाेजन करण्यात आले. त्यानंतर आशिया कपमध्येही भारतीय संघ सहभागी होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.