आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • For The First Time In 40 Years Since 1983, India Has Hosted The Olympic Committee | Marathi News

ऑलिम्पिक समिती:1983 नंतर 40 वर्षांत प्रथमच ऑलिम्पिक समिती बैठकीचे मिळाले भारताला यजमानपद

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पुढील बैठकीचे यजमानपद भारताकडे असेल. पुढील वर्षी २०२३ मध्ये मुंबईत ही बैठक होईल. समितीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांनी भारतासाठी हा सन्मान असल्याचे म्हटले आहे. १९८३ नंतर प्रथमच ही बैठक भारतात होत आहे. २०२३ मध्ये मुंबईतील अत्याधुनिक जिओ कन्व्हेशन सेंटरमध्ये ही बैठक होईल. बीजिंगमध्ये शनिवारी झालेल्या बैठकीत मुंबईत ही बैठक घेण्यास ७५ सदस्य देशांनी मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या दरवर्षी सदस्य देशांशी बैठका होतात. यात १०१ सदस्य असून ४५ मानद सदस्य आहेत. ऑलिम्पिसंबंधी निर्णयांवर या बैठकीत चर्चा होत असते.

दरम्यान, भारताला ऑलिम्पिकसारख्या महासोहळ्याचे यजमानपद मिळण्याच्या दृष्टीने देशात होत असलेली ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...