आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्विझर्लंडचा रॉजर फेडरर जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला. ३८ वर्षीय फेडररने गेल्या वर्षी १०६ मिलियन डॉलर (जवळपास ८०२ कोटी रु.) कमाई केली. त्याने यात ७५५ कोटी रुपये केवळ जाहिरातीतून कमावले, इतर बक्षीस रक्कम व इतर गोष्टीतून. फेडररने लियोनेल मेसीला मागे सोडले. फेडरर फोर्ब्जच्या सर्वाधिक कमाईच्या अव्वल १०० खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचणारा पहिला टेनिसपटू बनला. तो १९९० पासून सुरू झालेल्या यादीत अव्वल स्थानी पोहोचणारा नववा खेळाडू ठरला. अव्वल १०० खेळाडूंची वर्षीची कमाई एकूण ३.६ बिलियन डॉलर (२७ हजार १८८ कोटी रुपये) आहे, जी गेल्या वेळेसपेक्षा ९ टक्क्यांनी कमी आहे. २०१६ नंतर पहिल्यांदा कमाईत घसरण झाली.
१९६ काेटींची कमाई, विराट फाेेर्ब्जच्या टाॅप-१०० मध्ये
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली याने वर्षभरात १९६ काेटी रुपयांची कमाई करून या वर्षात सर्वात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या खेळाडूं्च्या फाेर्ब्ज मॅगझिनच्या यादीमध्ये अव्वल १०० खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे.
स्वित्झर्लंडचा टेनिसपटू राॅजर फेडरर ८०० काेटींची कमाई करून अव्वलस्थानी आहे. फेडररने उत्पन्नामध्ये नामांकित फुटबाॅलपटूंना मागे टाकले आहे. गेल्या वर्षी ताे पाचव्या स्थानावर हाेता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.