आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Foreign Stars Shine In Women's Premier League: Harris' Winning Half century, Tara And Garth 5 Wickets Each

विदेशी स्टारची महिला प्रीमियर लीगमध्ये खास चमक:हॅरिसचे विजयी अर्धशतक, तारा व गार्थचे प्रत्येकी 5 बळी

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेस हॅरिस : ६ वर्षांनंतर पुनरागमन, राष्ट्रकुल व टी-२० मध्ये चॅम्पियन
यूपी वाॅरियर्ज संघाच्या विजयात सामनावीर ग्रेस हॅरिसचे (५९) माेलाचे याेगदान राहिले. त्यामुळेच स्नेह राणाच्या नेतृत्वाखाली यूपी वाॅरियर्ज संघाला शनिवारी लीगमधील आपल्या पहिल्याच सामन्यात गुजरातवर ३ गड्यांनी मात करता आली. यादरम्यान हॅरिस आणि साेलापूरच्या किरणची खेळी लक्षवेधी ठरली. सामनावीर हॅरिसने २६ चेंडूंत नाबाद ५९ धावांची खेळीत संघाला १९.५ षटकांत विजय मिळवून दिला. तब्बल सहा वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणाऱ्या हॅरिसची गत दाेन वर्षाातील कामगिरी लक्षवेधी ठरली. तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघासाठी लक्षवेधी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिलांच्या टी-२० विश्वचषकातही तिची कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्यामुळे तिला संघाच्या विश्वविजेतेपदासाठी माेलाचे याेगदान देता दिले. तिच्या नावे २०१८ मध्ये महिला लीगमध्ये ४२ चेंडूंमध्ये सर्वात वेगवान शतकाची नाेंद झाली हाेती. तिने बिग बॅशमध्ये ५५ चेंडूंत शतक साजरे.
{ १७३ च्या स्ट्राइक रेटने ३३ टी-२० सामन्यांत ३३४ धावा काढल्या. बिग बॅश लीगमध्ये १०२ सामन्यांत दाेन शतकांसह २०७६ धावांची नाेंद.

तारा नॉरिस : अमेरिकेमध्ये जन्म, वयाच्या १६ व्या वर्षी केले पदार्पण
पदार्पणात पाच बळी घेत अमेरिकन वेगवान गाेलंदाज तारा नाॅरिसने दिल्ली कॅपिटल्स संघाला माेठा विजय मिळवून दिला. याच खेळीतून दिल्ली संघाने स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. ताराने सामन्यात २९ धावा देताना पाच बळी घेतले. तिची हीच कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्यामुळे तिला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले. तिचा जन्म अमेरिकेत झाला. त्यानंतर वयाच्या आठव्या वर्षी तिला इंग्लंडमध्ये कुटुंबीयांसमवेत स्थलांतरित व्हावे लागले. तिने वयाच्या १६ व्या वर्षी इंग्लंडमध्ये ससेक्स संघाकडून पदार्पण केले. यादरम्यान तिला आपल्या दर्जेदार कामगिरीमुळे महिला क्रिकेटमध्ये छाप पाडता आली. हा पल्ला गाठताना तिला माजी खेळाडू शार्लाेट एडवर्ड‌्सचे माेलाचे मार्गदर्शन लाभले. यामुळे तिच्या कामगिरीचा दर्जा उंजावला. तसेच तिने २०२१ मध्ये द हंड्रेडच्या फायनल्समध्ये आपल्या साऊथर्न ब्रेव्स संघाचा प्रवेश निश्चित केला. तिच्या नावे या स्पर्धेत सहा सामन्यांत लक्षवेधी खेेळीची नाेंद झाली.
{ताराने सर्वाेत्तम कामगिरीतून ५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत चार बळी घेतले. तिच्या नावे द हंड्रेड स्पर्धेतील सहा सामन्यांत ३ बळींची नाेंद आहे.

किम गार्थ : ऑस्ट्रेलियाकडून दुसरी इंनिंग, घरच्यांकडून क्रिकेटचे धडे
ऑस्ट्रेलियन युवा गाेलंदाज किम गार्थचे लीगमधील पदार्पण लक्षवेधी ठरले. तिने गुजरात संघाकडून खेळताना शनिवारी यूपी वाॅरियर्ज टीमचे पाच बळी घेतले. मात्र, तिला आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. तिने याच गाेलंदाजीतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २४ वर्षी किम गार्थला २०१० मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी पदार्पणाची संधी मिळाली. यादरम्यान तिने आयर्लंड संघाकडून १४ व्या वर्षी उल्लेखनीय कामगिरीची नाेंद केली. त्यानंतर तिने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतर केले. मात्र, याच दरम्यान काेराेनामुळे जगभरातील क्रिकेटला माेठा ब्रेक लागला. तिला ऑस्ट्रेलिया संघात खेळण्याची संधी मिळाली. तिने बिग बॅश लीगमध्ये सहभागी हाेत आपली दर्जेदार क्षमता सिद्ध केली. त्यामुळे तिला सीनियर महिला संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तिला घरातूनच क्रिकेटचे धडे मिळाले. कारण, तिचे वडील जाॅनथन गार्थ आणि आई एेनी हे दाेघेही आयर्लंड संघाकडून खेळलेेले आहेत.
{ गार्थने बिग बॅश लीगमधील १४ सामन्यांत १२ विकेट घेतल्या. तिच्या नावे ११ वनडेत १३ आणि २९ टी-२० सामन्यांत २८ बळींची नाेंद आहे.

बातम्या आणखी आहेत...