आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट विश्वात शोककळा:ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रयू सायमंड्सचे निधन, कार अपघातात मृत्यू

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि दिग्गज क्रिकेटपटू अँड्रयू सायमंड्स याचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री 10.30 वाजता ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविले येथे कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, क्वीन्सलँड शहराच्या पश्चिमेला सुमारे 50 किलोमीटर अंतरावर एक भरधाव कार रस्त्यावर उलटली. याच कारमध्ये अँड्रयू सायमंड्सदेखील होता.

अपघातात सायंमड्सला गंभीर दुखापती
एलिस नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यावेळी सायमंड्स कारमध्ये एकटाच होता. अपघातामुळे सायमंड्सला गंभीर दुखापती झाल्या. घटनेनंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले.

क्रिकेटविश्वात शोक
46 वर्षीय अँड्र्यू सायमंड्सच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ॲडम गिलख्रिस्टने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे. हे अत्यंत वेदनादायक असल्याचे त्याने म्हटले आहे. तर, संपूर्ण क्रिकेट विश्वासाठीच हा दुःखाचा दिवस आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटले आहे. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, 'आमचे मैदानावर आणि त्यापलीकडेही सुंदर नाते होते. आम्ही त्याच्या कुटुंबीयांसोबत आहोत.'

यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंनी घेतला जगाचा निरोप
ऑस्ट्रेलियन क्रिडा जगतासाठी हे वर्ष अत्यंत दुःखद ठरले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू रॉड मार्श आणि शेन वॉर्न यांचाही याच वर्षी मृत्यू झाला. शेन वॉर्नचे थायलंडमधील फार्म हाऊसवर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आणि आता अँड्र्यू सायमंड्सचा अपघातात मृत्यू झाला आहे.

2008 मध्ये सायंमड्सने हरभजनवर माकड म्हटल्याचा आरोप केला होता.
2008 मध्ये सायंमड्सने हरभजनवर माकड म्हटल्याचा आरोप केला होता.

हरभजनने माकड म्हटल्याचा केला होता आरोप
अँड्रयूने 2008 मध्ये भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगवर आरोप केला होता की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंगने त्याला माकड म्हटले होते. या प्रकरणावर सुनावणी होऊन भारतीय ऑफस्पिनरला क्लीन चिट देण्यात आली होती. हे प्रकरण पुढे 'मंकीगेट' म्हणूनच प्रसिद्ध झाले होते.

बातम्या आणखी आहेत...