आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर डीन जोन्स यांचे मुंबईत निधन, आयपीएलच्या समालोचनासाठी आले होते भारतात

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर डीन जोन्स(59) यांचे मुंबईत ह्रदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. डीन सध्या आयपीएलच्या समालोचनासाठी मुंबईत आले होते. डीन यांनी अनेक सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. याशिवाय निवृत्तीनंतर डीन जोन्स यांनी अनेक देशांच्या क्रिकेट टीमसाठी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. बॅटींग आणि फील्डिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या डीन यांच्या नावावर टेस्ट क्रिकेट प्रकारात अनेक रेकॉर्ड आहेत.

भारताचे प्रशिक्षक रवी शास्री यांनी जोन्स यांना ट्वीटरवरुन श्रद्धांजली दिली

डीन यांची कारकीर्द

डीन यांनी त्यांच्या करिअरमध्ये 52 कसोटी, 164 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्‍ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. टेस्‍टमध्ये 216 आणि वनडेमध्ये 145 त्यांचा सर्वोत्तम स्‍कोअर होता. त्यांनी टेस्‍ट क्रिकेटमध्ये 46.55 च्या सरासरीने 3,631 रन काढले. त्यात 11 शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, वनडे इंटरनॅशलनमध्ये जोंस यांनी 44.61 च्या सरासरीने 6,068 धावा काढल्या होत्या. त्यात, 7 शतके आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...