आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Former Captain Of Divyang Cricket Team's Application For The Post Of Servant; Wages In MNREGA

क्रिकेट:दिव्यांग क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराचा सेवक पदासाठी अर्ज; मनरेगात करताे मजुरी

नवी दिल्ली/पिथोरागड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे भारतीय क्रिकेटपटू कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत, दुसरीकडे भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा माजी कर्णधार दिनेश सेनने राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेमध्ये (नाडा) सेवक पदासाठी अर्ज केला आहे. त्याने २०१५ ते २०१९ दरम्यान भारताकडून ९ सामने खेळले आहेत. ३५ वर्षीय सेनवर पत्नी व एक वर्षाच्या मुलाची जबाबदारी आहे. त्याने म्हटले की, १२ वी पास केल्यानंतर त्याने नेहमी क्रिकेट खेळले आहे. भारताकडून खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. सेनने म्हटले की, ‘माझा पाय पोलिओग्रस्त आहे. मात्र, क्रिकेटच्या वेडाने मला कधी त्याची जाणीव होऊ दिली नाही.