आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Former Champion Srikanth Defeats Mads Christophersen 21 16, 21 17 |Marathi News

बॅडमिंटन:के. श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल, माजी चॅम्पियन श्रीकांतने मॅड्स क्रिस्टोफरसेनला 21-16, 21-17 ने हरवले

बासेल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत स्विस ओपनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. माजी चॅम्पियन श्रीकांतने डेन्मार्कच्या मॅड्स क्रिस्टोफरसेनला सलग सेटमध्ये २१-१६, २१-१७ ने हरवले. दोन्ही खेळाडू प्रथमच समोरासमोर आले होते. श्रीकांतने अवघ्या ३२ मिनिटांत विजय मिळवला.

श्रीकांतने ही स्पर्धा २०१५ मध्ये जिंकली होती. तेव्हा तो तत्कालीन जगातील नंबर-१ खेळाडू डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनला ३ सेटमध्ये हरवत चॅम्पियन बनला होता. आता उपउपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा सामना जपानच्या कौकी वतनबे आणि फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव यांच्यातील विजेत्याशी होईल.

सात्त्विक-चिराग विजयी
तिसऱ्या मानांकित सात्विकसाईराज रंकिरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने शानदार विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत सात्विक-चिराग जोडीने इंडोनेशियाच्या मुहम्मद शोहिबुल फिकरी व बागस मौलाना जोडीला १७-२१, २१-११, २१-१८ ने हरवले. त्याचबरोबर, मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीमध्ये सुमीत बी. रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...