आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी भारतीय क्रिकेटर वसीम जाफरवर क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंड (CAU) च्या आधिकाऱ्यांनी संघ निवडित धार्मिक भेदभाव केल्याचा आणि बायो-बबलमध्ये ट्रेनिंगदरम्यान कँपमध्ये नमाजसाठी मौलवींना बोलव्याचा आरोप लावला आहे. दरम्यान, वसीम जाफरने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. दरम्यान वसीम जाफरने या आरोपानंतर मंगळवारी उत्तराखंड संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला.
जाफरने ‘राम भक्त हनुमान की जय’ स्लोगन बदलले
CAU चे सचिव महिम वर्मा आणि सलेक्शन कमेटीचे चेअरमन रिजवान शमशादने आरोप लावलाहोता की, जाफरने कुणाल चंदिलाच्या जागी इकबाल अब्दुल्लाला कर्णधार बनवले. इकबालला पुढे नेण्यासाठी सलामीला फलंदाजी करायला पाठवले आणि ओपनर चंदिलाला मिडल ऑर्डरला पाठवले. तसेच, ट्रेनिंग कँपमध्ये मौलवी आल्यानंतर जाफरने संघाचा स्लोगन ‘राम भक्त हनुमान की जय’ बदलायला लावला. जाफरने कथितरित्यायाला ‘गो उत्तराखंड’केले.
सलेक्टर आणि सचिवने इकबालला कर्णधार बनवले: जाफर
या आरोपांवर जाफर म्हणाला की, ‘मी त्यांना (महिम आणि शमशाद)म्हणालो होतो की, संघाचा कर्णधार जय बिष्टाला बनवले जावे. तो तरुण आहे आणि कर्णधार होण्यास तयार आहे. ते त्यावेळेस तयार झाले, पण टूर्नामेंटसाठी आल्यानंतर त्यांनी इकबालला कर्णधार बनवण्यास सांगितले.’
जाफर पुढे म्हणाला की, ‘धार्मिक भेदभावाचा आरोप खुप दुःखद आहे. मी सर्वकाही माझ्या ईमेलमध्ये लिहून दिले होते. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. ते या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन माझ्याविरोधात चुकीचे आरोप करत आहेत.'
‘धार्मिक भेदभाव करायचा असता, तर अल्ला-हु-अकबर म्हणायला लावले असते’
यावेळी जाफरने स्लोगन ‘राम भक्त हनुमान की जय’ वरही भाष्य केले. तो म्हणाला की, ‘हा (जय श्री राम किंवा जय हनुमान) स्लोगन मी कँपमध्ये कधीच ऐकले नाही. प्रॅक्टीस सामन्यादरम्यान काही खेळाडू ‘रानी माता सच्चे दरबार की जय’ घोषणा द्यायचे. ही शिख समाजातील घोषणा असून, संघातील दोन शिख खेळाडू ही घोषणा द्यायचे.’
'सैयद मुश्ताक अली टूर्नामेंटसाठी बड़ौदात गेल्यानंतर चंद्रकांत पंडित आणि काही खेळाडूंच्या सांगण्यावरुन मी ‘गो उत्तराखंड’ आणि ‘लेट्स डू इट उत्तराखंड’ आणि ‘कम ऑन उत्तराखंड’च्या घोषणा देण्याबद्दल बोललो होतो. मला जर धार्मिक भेदभाव करायचा असता, तर मी अल्ला-हु-अकबर म्हणायला लावले असते,’ असे जाफर आपल्या स्पष्टीकरणात म्हणाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.