आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रीडा:माजी हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन, ऑलम्पिक फायनलमध्ये सर्वात जास्त गोल करण्याचा त्यांचा रेकॉर्ड आजही कायम 

मोहालीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बलबीर सिंग यांनी हेलसिंकी ऑलम्पिक फायनलमध्ये केले होते 5 गोल

भारताचे महान हॉकीपटू बलबीर सिंग यांचे सोमवारी सकाळी वयाच्या 96 व्या वर्षी मोहाली येथे निधन झाले. मागील दोन आठवड्यांपासून ते फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हॉकी इंडियानेही माजी ऑलिम्पियन बलबीर सिंग यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

बलबीर सिंग याना 8 मे रोजी निमोनियामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. उपचार चालू असतानाच त्यांना तीन वेळेस हृदयविकाराचा झटकाही आला होता. मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळे ते 18 मेपासून कोमामध्ये होते.

बलबीर सिंग यांनी हेलसिंकी ऑलम्पिक फायनलमध्ये केले होते 5 गोल

बलबीर सिंग यांनी 1952 च्या ऑलम्पिक फायनलमध्ये नेदरलँड्स विरुद्ध 5 गोल केले होते. ऑलिम्पिक फायनलमध्ये सर्वात जास्त गोल करण्याचा त्यांचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे. भारताने हा सामना 6-1 ने जिंकला होता.

बातम्या आणखी आहेत...