आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Former NFL Player Raleigh Now Became Doctor; The International Superstar, Now In The Role Of Angel, Rushes To The Needy

मदत:माजी एनएफएल खेळाडू राेले आता डाॅक्टरच्या भूमिकेत; आंतरराष्ट्रीय मैदाने गाजवणारे सुपरस्टार आता देवदूताच्या भूमिकेत गरजूंच्या मदतीला धावून

न्यूयाॅर्क3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राेेले व हेलेने निवृत्तीनंतर वैद्यकीय शिक्षण केले पूर्ण

सलीम वलजी

33 वर्षीय मायराेन हा एनएफएलचा सुपरस्टार खेळाडू अाहे. मात्र, अाता काेराेना व्हायरसच्या जीवघेण्या अाव्हानाला परतावून लावण्यासाठी ताे देवदूताच्या भूमिकेत मैदानावर उतरला अाहे. डाॅक्टरच्या भूमिकेत ताे सध्या काेराेनाग्रस्तावर उपचार करत अाहे. ताे अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगमध्ये (एनएफएल) टेनेसी टायटन्सकडून खेळला. २०१३ मध्ये त्याने खेळणे सोडले आणि फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनमध्ये प्रवेश घेतला. यातील प्रचंड मेहनतीच्या बळावर यामध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर तो मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून न्यूरो सर्जरीचा अभ्यास करत होता. येथे ताे काेविडच्या रुग्णांवर उपचारही देत ​​आहे. याशिवाय राेले हा  आपत्कालीन कक्षातील डॉक्टरांच्या टीममध्ये आहे.  यामुळे ताे अाणि  त्याचे सहकारी या ठिकाणी २४ तास अत्यावश्वक सेवा देत अाहेत. 

अाॅलिम्पिक चॅम्पियन हेलेही मदतीसाठी रुग्णालयात दाखल; फ्रंटलाइन कामगारांसाठी वैद्यकीय उपकरणे पुरवते 

कॅनडाची हेले विकेनहाइसर चार वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक  विजेती अाहे. माजी आइस हॉकीपटू हेले आता कॅलगरी विद्यापीठात वैद्यकीय अभ्यास घेत आहे. “तिला दहा वर्षांची असताना दोन स्वप्ने पडली. एक व्यावसायिक हॉकी खेळत आहे आणि दुसरे डॉक्टर बनत आहे. माझे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. आता मी दुसरे स्वप्न पूर्ण करीत आहे, असे ती म्हणाली. ४१ वर्षीय हेलेने तीन वर्षांपूर्वी २०१७ मध्ये अांतरराष्ट्रीय करिअरमधून निवृत्ती घेतली. सध्या महामारीच्या संकटात हेले ही वैद्यकीय सेवा देण्यासाठी सक्रिय अाहे. मेडिकलची विद्यार्थिनी असल्याने तिला याबाबतची माेठी माहिती अाहे. त्याचा फायदा अाता काेराेनाग्रस्तांंसाठी करण्यासाठी तिने पुढाकार घेतला.

भारतीय फुटबॉलपटूू विनीत करताेय सेंटरच्या माध्यमातून गरजूंना मदत

कन्नूर  आयएसएलच्या जमशेदपूर एफसीचा फाॅरवर्ड खेळाडू सी. के. विनीत सध्या कन्नूर जिल्ह्यात एका काॅल सेंटरमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत अाहे. यातील अनुभवाच्या बळावर अाता त्याला मंगटीडम पंचायतमध्ये सुरू करण्यात अालेल्या काॅल सेंटरमध्ये काम करण्याची संधी मिळाली. कन्नूर प्रशासन अाणि केरळ स्पाेर्ट््स काैैन्सिलच्या वतीने हे संेंटर सुरू झाले. या ठिकाणी  गरजू माेठ्या संख्येत संपर्क साधून अापल्या अडचणींची माहिती देतात. तेव्हा या सर्वांपर्यंत तत्परतेने ही मदत पाेहोचवण्यासाठी काॅल सेंटरची भूमिका महत्त्वाची ठरत अाहे. यासाठी त्याच्यासाेबत १५ जण काम करतात. या ठिकाणी दिवसभरात जवळपास २०० पेक्षा अधिक काॅल येतात. याशिवाय विनीतचा सामाजिक कार्यात  सहभाग असताे. त्याने  मुलाच्या जन्मदाखल्यावर जातीचा उल्लेख असलेल्या काॅलममध्ये नील असे लिहले हाेते.

बातम्या आणखी आहेत...