आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Former Pakistani Cricketer Shoaib Akhtar Say T20 World Cup Postponed For IPL 2020 By BCCI And ICC

टी-20 वर्ल्ड कप रद्द झाल्याने पाकिस्तानचा संताप:शोएब अख्तर म्हणाला- बीसीसीआयला विश्वचषकापेक्षा आयपीएल जास्त महत्वाचे

स्पोर्ट डेस्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे यावर्षी ऑस्ट्रेलिया त होणारा टी-20 वर्ल्ड कप रद्द करण्यात आला आहे

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर आणि राशिद लतीफला आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कप रद्द झालेले आवडलेले नाही. त्याने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)वर आरोप लावले आहेत की, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)साठी हे वर्ल्ड कप रद्द करण्यात आला आहे. अख्तर पुढे म्हणाला की, बीसीसीआयसाठी विश्वचषकापेक्षा आयपीएल जास्त महत्वाचा.

कोरोनामुळे इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (आयसीसी) ने 20 जुलैला टी-20 वर्ल्ड कप एक वर्षासाठी पुढे ढकलला. टुर्नामेंट यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार होता. आता या टुर्नामेंटच्या जागी आयपीएल होण्याची शक्यता आहे.

शक्तिशाली लोक क्रिकेट चालवत आहेत

अख्तर एका पाकिस्तानी न्यूज चॅनलसोबत झालेल्या बातचीतदरम्यान म्हणाला की, 'आज शक्तिशाली लोक पॉवरफुल बोर्ड (बीसीसीआय) क्रिकेट चालवत आहेत. यावर्षीया आशिया कप झाला असता. भारत आणि पाकिस्तानमधील सामना होण्याची शक्यता होती. टी-20 वर्ल्ड कप झाला असता, पण मी राशिदला म्हणालो होतो ती, (बीसीसीआय) शक्तिशाली लोक हे होऊ देणार नाहीत. सहा महिन्यांपासून हे सर्व सुरू आहे.'

इतर क्रिकेट बोर्डांना फायदा होऊ नये, साठी वर्ल्ड कप रद्द केला

दरम्यान, राशिद लतीफ म्हणाला की, टी-20 वर्ल्ड कपमुळे इतर सर्व क्रिकेट बोर्डांना फायदा झाला असता. यामुळेच आयसीसीने याला रद्द केले. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सर्वांनी एकमेकांना साथ द्यायला हवी, पण असे होत नाही.