आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Former Player Kalyan Chouben Wins 33 1 Victory Over Baichung Bhutian As FAI President For The First Time

निवड:भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी प्रथमच माजी खेळाडू, कल्याण चौबेंची बायचुंग भुतियांवर 33-1 ने मात

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा अध्यक्ष मिळाला, जो पूर्वी खेळाडू होता. मोहन बागान आणि ईस्ट बंगालचे माजी गोलकीपर कल्याण चौबे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांना ३३-१ ने पराभूत केले. याआधी प्रफुल्ल पटेल आणि दिवंगत प्रियरंजन दासमुन्शी फेडरेशनचे अध्यक्ष होते. ते पूर्णकालिक राजकीय नेते होते. सिक्कीममधील रहिवासी असलेल्या बायचुंग भुतिया यांनी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्या राज्य संघाचे प्रतिनिधीही प्रस्तावक किंवा अनुमोदक झाले नव्हते. कल्याण चौबे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तथापि, ते पराभूत झाले होते. ते कधीही भारतीय वरिष्ठ संघाकडून खेळले नाहीत. मात्र, काही वेळा संघात सहभागी होते आणि वयोगट स्पर्धेत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. कर्नाटक फुटबॉल संघाचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार एन. ए. हारिस हे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले.

बातम्या आणखी आहेत...