आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Formula 1 Debut In Miami; 75 Design Fixed 5.14 Km Track, The Second Circuit Of The F One In The United States

फॉर्म्युला-1:मियामीमध्ये फॉर्म्युला-1 चे पदार्पण; 75 डिझाइन निश्चित झाला 5.14 किमीचा ट्रॅक, अमेरिकेतील एफ-वनचे दुसरे सर्किट

मियामी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामीमध्ये आठवड्याच्या शेवटची फॉर्म्युला वन रेस होणार आहे. फ्लाेरिडाच्या मियामी गार्डन्समधील हाॅर्ड राॅक स्टेडियमनजीकच्या आंतरराष्ट्रीय आॅटाेड्रम सर्किटवर ही रेस होणार आहे. यामध्ये १० संघांचे २० एफ-१ रेसर आपले काैशल्य पणास लावणार आहेत. यासह मियामीमध्ये एफ-वनचे दमदार पदार्पण होणार आहे. हे अमेरिकेतील एफ-वनचे दुसरे सर्किट ठरले आहे. अमेरिकेत यापूर्वी टेक्सास येथेही रेसचे आयोजन केेले जाते. मियामी ग्रांप्रीच्या ट्रॅकचे आॅक्टाेबर २०१९ मध्ये डिझाइन करण्यात आले होते. त्यानंतर यासाठी जवळपास ७५ प्रकारच्या डिझाइन करण्यात आल्या. यातील एक डिझाइन निवडण्यात आली.

या ५.४१२ किमीच्या ट्रॅकवर जवळपास १९ वळणे आहेत. रेस ३०८.३२६ किमी लांब असणार आहे. यात ५७ लॅप असतील. अमेरिकेत ही रेस असल्याने भारतात रात्रीच्या वेळी प्रक्षेपण होणार आहे.

5.412 किमी लांब ट्रॅक

बातम्या आणखी आहेत...